मुंबई : काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विज्ञान, वाणिज्य आणि कला शाखेच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द केल्याची घोषणा केली होती. तसंच अभियांत्रिकी आणि व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या शिखर संस्थांनाही परीक्षा रद्द करण्याची विनंती केली होती. मात्र, आता युजीसीने पुन्हा सप्टेंबर महिन्यात परीक्षा घेण्याची भूमिका घेतल्याने विद्यार्थ्यांमध्ये अंतिम वर्षाच्या परीक्षांवरुन संभ्रम निर्माण झाला आहे. अंतिम वर्षाच्या परिक्षेबाबत युजीसीचा हा निर्णय निषेधार्थ असल्याचं म्हणत विद्यार्थ्यांनी परीक्षांवर बहिष्कार टाकावा, असं आवाहन छात्रभारती मुंबई अध्यक्ष रोहित ढाले यांनी केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विद्यार्थ्यांना जाणीवपूर्वक वेठीस धरण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप रोहित ढाले यांनी केला आहे. त्यामुळे या निर्णयाविरोधात विद्यार्थ्यांनी असहकार आंदोलन सुरु करुन जोपर्यंत कोरोनावर लस निघत नाही आणि मुंबई ग्रीन झोन घोषित होत नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांनी सर्व परीक्षांवर बहिष्कार टाकावा असं आवाहन त्यांनी केलं आहे.


विनाकारण विद्यार्थ्यांना वेठीस धरण्याचं काम युजीसी करत आहे, युसीजी विद्यार्थ्यांचा मानसिक छळ करत असून परीक्षांबाबत वारंवार बदलती भूमिका विद्यार्थ्यांसाठी त्रासदायक ठरणारी आहे, असंही ते म्हणाले. 


coronavirus: 'ही' लक्षणं आढळल्यास दुर्लक्ष करु नका, डॉक्टरांचा इशारा


मुंबईत कोरोनाची परिस्थिती अतिशय चिंताजनक आहे. ठिकठिकाणी शाळा, कॉलेजेस विलगीकरणासाठी वापरले जात आहेत. मुंबईतील अनेक ठिकाणं प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहेत. असं असतानाही ग्राऊंड रिएऍलिटिचा अभ्यास न करता युजीसी पोरखेळ करत असल्याचा आरोप रोहित ढाले यांनी केला आहे.