* राज्यसभेचे खासदार डॉ. सुभाष चंद्रा अशा याचिकाकर्त्यांकडे व्यक्तिगत लक्ष देतील, ज्यांना १० हजारपेक्षा जास्त स्वाक्षऱ्यांचा पाठिंबा असेल. पाठिंबा मिळालेल्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी संबंधितांसमोर तो प्रश्न मांडला जाईल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

* समस्या सोडवण्याचा हा मंच, महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी, महात्मा गांधींची प्रार्थना - ‘वैष्णव जन तो’सोबत लॉन्च करण्यात आला.


* प्रसिद्ध संगीत निर्देशक अमित त्रिवेदी या भजनाला देशाच्या नावाजलेल्या गायकांची साथ घेऊन संगीतबद्ध करतील आणि यातून देशाच्या युवकांना प्रेरणा मिळेल.


मुंबई : देशाच्या नागरिकांना सशक्त आणि त्यांना आपली चिंता जाहीर करण्यासाठी एक मंच उपलब्ध करून देण्याचं काम सुभाष चंद्रा करीत आहेत. सुभाष चंद्रा (SACH) फाऊंडेशनने मंगळवारी गांधी जयंतीच्या दिवशी, 'देश का सच' हा मंच सुरू केला.


राज्यसभेचे खासदार डॉ.सुभाष चंद्रा यांची संकल्पना साकारणारा, 'देश का सच' जनहित याचिका मंच, एक वन स्टॉप प्लॅटफॉर्म आहे. हा मंच जनहितार्थ मुद्दे प्रकाश झोतात आणेल, यामुळे ते लक्षवेधी ठरून लोकांना प्रेरणादायी ठरतील.


असे लोक जे जनहित प्रकरणात सशक्त परिस्थितीत सकारात्मक बदल करण्यासाठी प्रयत्न करीत आहे, ते याचिका दाखल करू शकतात, किंवा इतर व्यक्तीच्या याचिकेला पाठिंबा देऊ शकतात. डॉ. सुभाष चंद्रा यांनी स्वत: याचिका दाखल केली आहे, या याचिकेला १० हजार लोकांनी पाठिंबा दिला आहे, तसेच या प्रश्नावर तो़डगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू केला आहे.


आपले विचार या मंचावर मांडताना, डॉ सुभाष चंद्रा म्हणाले, मी आपल्या समाजातील गंभीर मुद्दे आणि सामाजातील महत्वाच्या अडचणी सोडवण्यासाठी हा मंच दिला आहे. देशाचा नागरिक असल्याकारणाने माझा यावर दृढ विश्वास आहे की, देशाला पुढे नेण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे.


डॉ. सुभाष चंद्रा यांनी पुढे म्हटलंय, 'देश का सच' आव्हानांना आवाज देण्याचं काम, प्रत्येक व्यक्तीला साथ देण्याचा हा प्रयत्न आहे. लोकांना जवळ आणून त्यांना अधिक सक्षम बनवण्याचा आमचा प्रयत्न आहे, यामुळे ते एकमेकांची मदत करू शकतील. मला अपेक्षा आहे की, लोक या संधीचा उपयोग करून घेतील. देश आपला आहे, म्हणून जबाबदारी देखील आपलीच आहे.'


'देश का सच'चा मूळभाव सुंदर पद्धतीने मांडण्यासाठी लोकप्रिय भजन 'वैष्णव जन तो' पासून पुढे जाण्याची प्रेरणा घेता येते. याची सुरूवात प्रसिद्ध संगीत निर्देशक अमित त्रिवेदी यांच्यासह नावाजलेल्या गायकांच्या सुमधूर संगीताने लॉन्च केलं जाणार. हे भजन पंधराव्या शतकातील कवि नरसी मेहता यांनी लिहिलं होतं. हे भजन आज एकविसाव्या शतकात देखील प्रासंगिक वाटतं, यात समानता, एक दुसऱ्यांविषयी सन्मान करा आणि अडचणीत अडकलेल्या लोकांना मदत करण्याविषयी प्रेरणा देतं.


फाऊंडेशनचा उद्देश भारताला जागतिक पटलावर पुढे आणणे आहे, देशाच्या समोर येणाऱ्या आव्हानांना संपवणं आहे. राज्यसभेचे खासदार सुभाष चंद्रा सतत मानवी मुल्यांचा प्रचार करीत आहेत आणि काही सामाजिक प्रभाव तसेच विकासात्मक गोष्टी प्रकर्षाने पुढे आणून लोकांचं जीवन अधिक सशक्त करण्याचा प्रयत्न करीत आहेत.


सुभाष चंद्रा फाऊंडेशनचा परिचय


सुभाष चंद्रा फाऊंडेशन एस्सेल ग्रुप की लोकोपकारी शाखा आहे, ज्यात समृद्ध समाजासाठी विचारांची देवाण घेवाण करणे, योगदान देणे, मदत करणे या उद्देशांसाठी स्थापन करण्यात आली आहे. एक अशी पद्धत ज्यात सर्व समावेशक समुदायाचा विकास आणि उत्थान करणे. फाऊंडेशनचा उद्देश मुख्यधारापासून कमजोर क्षेत्रात मॉडेल बनवण्यात मदत करणे.