`अल्बर्ट पिंटो को इतना गुस्सा क्यू आता है`; सुधीर मुनगंटीवार यांची अजित पवारांवर टीका
अजित पवार यांना राग का आला? वाचा नेमकं काय घडलं..
मुंबई : तीन तासांच्या प्रतिक्षेनंतरही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एका कार्यक्रमस्थळी न आल्याने विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) कंटाळून मंत्रालतून (Mantralaya) निघून गेले. मुंबईत (Mumbai) लोगो अनावरणाच्या कार्यक्रमात अजित पवार उपस्थित होते. मात्र तीन तासांनंतरही मुख्यमंत्री आल्याने अजित पवार कार्यक्रमाच्या ठिकाणाहून निघून गेले. (Sudhir Mungantiwar criticizes Ajit Pawar after Mantralaya drama)
या कार्यक्रमासाठी अजित पवार (Ajit Pawar) 12 वाजता मंत्रालयात आले होते. पण मंत्रिमंडळ बैठक लांबल्यामुळे ते तीन तास माहिती जनसंपर्क सचिवांच्या कार्यालयात बसून होते. अखेर कंटाळून अजित पवार हे मंत्रालयातून निघून गेले.
यावर आता राज्याचे पर्यावरण मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिलीय. अल्बर्ट पिंटो को इतना गुस्सा क्यू आता है असा टोला सुधीर मुनगंटीवार यांनी अजित पवार यांना लगावला आहे.
काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार?
"मंत्रीमंडळाची बैठक कधी कधी थांबवणं अडचणीचं असतं. यामध्ये आपण राज्याच्या महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा करतो. त्यामुळे एखाद्या बैठकीत उशीर झाल्यानंतर आपण रागावणं म्हणजे अल्बर्ट पिंटो को इतना गुस्सा क्यू आता है असं म्हणावं लागेल," असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
नेमकं काय घडलं?
फिफा फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेचा (Fifa football world cup) बोधचिन्ह अनावरण सोहळा आज मंत्रालयात पार पडणातर होता. त्यासाठी अजित पावर आले होते. परंतु कॅबिनेट सुरू असल्यामुळे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना येण्यास उशीर झाला. त्यामुळे अजित पवार नाराज झाल्याची चर्चा सुरुय.