मुंबई : मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत धर्मा पाटील यांच्या प्रकरणाची मुख्य सचिवांमार्फत चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रकरणाबाबत मुख्य सचिव यांना पूर्ण चौकशी करत पुढच्या मंत्रिमंडळ बैठकीत माहिती सादर करायला सांगितलंय.  जे अधिकारी दोषी असतील त्यावर कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती अर्थमंत्री सुधीर मुंगनटीवर यांनी दिली.


 मुख्यमंत्री यांनी धर्मा पाटील प्रकरणाबाबत मुख्य सचिव यांना पूर्ण चौकशी करत पुढच्या मंत्रिमंडळ बैठकीत माहिती सादर करायला सांगितले आहे. जे अधिकारी दोषी असतील त्यावर कारवाई करतील, अशी माहिती त्यांनी दिली. 



यावेळी त्यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेला सुनावले. यावर राजकारण करू नये. सरकार संवेदनशील आहे. विविध योजना सरकार राबवत आहे.  जेव्हा धर्मा पाटील यांच्या मुलाने संगितले आहे की राजकारण करू नये. त्याबाबत टीका कशाला, असे ते म्हणालेत.


ज्या मंत्र्यांवर आरोप झालेले आहेत. त्यामंत्र्यांचा काहीही दोष नाही. राजकारणात मर्यादा काय ठेवल्या पाहिजेत याचेही भान हरवले गेले आहे, असे ते म्हणालेत.