धक्कादायक! मोबाईल गेम खेळण्याच्या भांडणातून अल्पवयीन मुलीची आत्महत्या
मुंबईमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
मुंबई : मुंबईमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 16 वर्षांच्या मुलीने आत्महत्या केली आहे. मुंबईतील समता नगरमध्ये ही घटना घडली आहे. भावाशी झालेल्या भांडणावरून तिने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं आहे.
या अल्पवयीन मुलीचा मोबाइल गेम खेळण्यावरून तिच्या भावासोबत वाद झाला. या वादानंतर 16 वर्षांच्या लहाने मुलीने आत्महत्या केली आहे. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.
समतानगर परिसरात ही घटना घडली असून या मुलीने उंदीर मारण्याचं औषध पिऊन आयुष्य संपवल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही मृत मुलगी रागीट स्वभावाची होती. त्यामुळे रागाच्या भरात येऊन तिने हे पाऊल उचलल्याचं सांगितलं जातंय.
शनिवारी दुपारी ही घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान या प्रकरणाची समतानगर नगर पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे.
दरम्यान काही दिवसांपूर्वी सूरतमध्ये अशाच कारणावरून गंभीर घटना घडली होती. गेमिंगच्या व्यसनापायी गुजरातच्या सूरतमध्ये एका मुलाने आपल्या पित्याचा जीव घेतला होता. या घटनेत वडिलांनी मुलाला गेम खेळताना विरोध केला. आणि त्यानंतर या अल्पवयीन मुलाने वडिलांची गळा दाबून हत्या केली होती.