सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत खाते असल्यास भरा ऑनलाईन पैसे, जाणून घ्या पद्धत
अशी करा मुलीच्या भविष्याची गुंतवणूक
मुंबई : सुकन्या समृद्धि योजनेत (Sukanya Samrudhi Yojana) अनेक जण मुलींच्या भविष्याचा विचार करून गुंतवणूक करतात. या योजनेंतर्गत एका वर्षात किमान 250 रुपये जमा करावे लागतात. आतापर्यंत हे पैसे भरण्यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन लांबच्या लांब रांगेत उभं राहावं लागतं. कोरोनाच्या या संकट काळात गर्दी टाळण्यासाठी आता ऑनलाईन पैसे भरण्याची व्यवस्था सुरू करण्यात आली आहे.
कोरोनाच्या संकटाच्या वेळीही आपण घराबाहेर पडणे टाळत आहोत. अशावेळी ऑनलाईन हा उत्तम पर्याय आहेत. सुकन्या योजनेत आतापर्यंत पोस्टात पैसे भरण्याची व्यवस्था होती. मात्र आता या योजनेत ऑनलाईन पैसे जमा करणे देखील समाविष्ट आहे. ऑनलाईन सेवेमार्फत या योजनेत ऑनलाईन पैसे कसे जमा करावेत? ऑनलाईन पैसे कसे ठेवायचे हे जाणून घ्या…
या महत्वाच्या स्टेप्समार्फत भरा ऑनलाईन पैसे
पोस्ट ऑफिसमध्ये सुकन्या समृद्धी खाते उघडले असेल तर ऑनलाईन पैसे भरू शकतो.
प्रथम आपलं बँक खाते IPPB खात्याशी जोडा. यानंतर डीओपी प्रॉडक्टस वर जा,
त्यानंतर सुकन्या समृद्धी खाते दिसेल आणि तुम्ही ते सिलेक्ट करा.
आपला SSY खाते क्रमांक आणि नंतर DOP ग्राहक आयडी टाईप करा.
सामान्य पेमेंट प्रक्रियेप्रमाणे हप्ता कालावधी आणि रक्कम निवडा.
प्रक्रिया पूर्ण करा, जेणेकरून आपल्या खात्यात पैसे हस्तांतरित होतील.
काय आहे ही योजना?
सुकन्या समृद्धी योजनेत किमान 250 रुपये आणि जास्तीत जास्त 1.50 लाख रुपये जमा करू शकता. या योजनेची मॅच्युरिटी कालावधी 21 वर्षे आहे, परंतु पालकांना त्यामध्ये केवळ 14 वर्षे गुंतवणूक करावी लागेल. या योजनेत तुम्ही जितकी गुंतवणूक केली असेल तितकाच मॅच्युरिटीवर तुम्हाला तीन पट नफा मिळेल. मुलगी 21 वर्षांच्या झाल्यावर किंवा तिचे वय 18 वर्षांनंतर लग्न झाल्याशिवाय हे खाते चालवले जाऊ शकते. सुकन्या समृद्धी खाते देशातील कोठेही हस्तांतरित केले जाऊ शकते.