मुंबई : रविवारी मध्य आणि हार्बर मार्गावर सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे काही काळ या मार्गावरची वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. काही मार्गात बदल करण्यात आले आहेत.


मध्य रेल्वे मार्गावर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स. ११.२० ते दु. ४.२० कल्याण ते ठाणे अप स्लो मार्गावर ब्लॉक. स. १०.४८ ते दु. ४.१५ कल्याणहून सुटणा-या स्लो आणि सेमी फास्ट मार्गावरील सेवा  मुलुंडपर्यंत जलद मार्गावरून जातील त्यानंतर धिम्या मार्गावरून चालवल्या जातील.


हार्बर रेल्वे मार्गावर


स. ११.३० ते दु. ४.३० पर्यंत पनवेल मानर्खुद अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक आहे. स. ११.०६ ते दु. ४.३८ पनवेल-बेलापूर-वाशी ते एसएमटीपर्यंत सेवा खंडित राहणार आहे. तसंच स. १०.०३ ते दु. ३.४४  सीएसएमटी ते पनवेल-बेलापूर-वाशीपर्यंत  पर्यंत सेवा खंडित राहणार


ट्रान्स हार्बर मार्ग


स. ११.०२ ते दु. ४.२६ पनवेलहून ठाण्याच्या दिशेने सेवा खंडीत राहणार आहे स. ११.१४ ते दु. ४  ठाणे ते पनवेलपर्यंत सेवा खंडीत राहणार आहे. पनवेल ते अंधेरी सेवाही ब्लॉक कालावधीत चालवण्यात येणार नाहीत. सीएसएमटी ते मानखुर्दपर्यंत विशेष लोकल चालवल्या जातील. 


पश्चिम रेल्वेवर 


पश्चिम रेल्वेवर शनिवार, २४ फेब्रुवारी रा. १२.३० ते पहाटे ४ पर्यंत वसई ते भाईंदरपर्यंत ब्लॉक चालणार आहे. त्यामुळे रविवारी सकाळी ब्लॉक घेण्यात येणार नाही.