मुंबई : तब्बल १५० वर्षांनतर आकाशात लाल चंद्र पाहण्याचा दुर्मिळ योग जुळून आला.. 'रेड मून ' म्हणजे काहीसा लाल रंगाचा, तोही नेहमीपेक्षा मोठ्या आकाराचा चंद्र आज आकाशात दिसला. 


चंद्र सुपरमून स्थितीत


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अवकाशातील दोन भौगोलिक घटना एकाच वेळी बघण्याची अनोखी अनुभूती यानिमित्तानं अनुभवता आली. आज चंद्रग्रहण असल्यामुळे चंद्रोदय होताना चंद्र सुपरमून स्थितीत दिसला. 



चंद्र पृथ्वीच्या जवळ 


नेहमीच्या ३ लाख ८४  हजार किलोमीटर या सरासरी अंतरावरून चंद्र ३ लाख ५६ हजार किलोमीटर अंतरावर म्हणजे तब्बल २८ हजार किलोमीटरनं चंद्र पृथ्वीच्या जवळ आला. त्यामुळे तो नेहमीपेक्षा मोठा दिसला. 


 चंद्र काहीसा लाल


याच काळात चंद्र पृथ्वीच्या सावलीत आल्यानं चंद्राला ग्रहण लागलं. याच कालावधीत सूर्यास्त झाल्यानं चंद्र काहीसा लाल दिसला.  त्यामुळेचं त्याला रेड मूनही म्हटलं जातं.