मुंबई : आरेमधील मेट्रो कारशेडचं बांधकाम सुरु राहणार आहे, काल सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणी दरम्यान हे स्पष्ट केलं आहे. मात्र वृक्षतोडीवर स्थगिती आणली आहे. आरेतील वृक्षतोडीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या जनहित याचिकेवर पर्यावरणविषयक खटल्यांचे कामकाज पाहणाऱ्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुनावणी दरम्यान महापालिकेच्या वतीने न्यायालयात युक्तिवाद करणारे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी आरेमध्ये सध्या कोणतीही झाडे तोडण्यात आली नसल्याची माहिती दिली. 


तसंच सर्वोच्च न्यायालायने दिलेल्या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात असल्याचंही त्यांनी सांगितलं.  इमारतीचा कोणताही प्रकल्प सुरु होत नसून त्या जागी फक्त आरे कारशेडचा प्रकल्प सुरु आहे. 


रोहतगी यांनी दिल्लीत मेट्रो सुरु झाल्यानतंर सात लाख वाहनं रस्त्यावरुन कमी झाली आहेत. तसेच वायू प्रदूषणही कमी झालं आहे. असेही न्यायालयात सांगितले त्यानंतर न्यायालयाने मेट्रो प्रकल्पावर कोणतीही स्थगिती नाही. 


ही स्थगिती फक्त वृक्षतोडीविरोधात मर्यादित असल्याचं स्पष्ट केलं. दरम्यान याप्रकरणाची पुढील सुनावणी १५ नोव्हेंबरला होणार आहे.