नवी दिल्ली : आताच्या घडीची मोठी बातमी समोर आली आहे. लवासा प्रकरणी पवार कुटुंबियांना सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दणका दिला आहे. पवार कुटुंबियांना सुप्रीम कोर्टाने नोटीस पाठवली असून 4 आठवड्यात प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लवासा कार्पोरेशन (lavasa corporation) आणि राज्य सरकारनंही 4 आठवड्यात आपलं उत्तर दाखल करावं असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहे. याचिकाकर्ते अॅड. नानासाहेब जाधव यांची याचिका सुप्रीम कोर्टानं दाखल करुन घेतली आहे. 


याप्रकरणी शरद पवार (Sharad Pawar), अजित पवार (Ajit Pawar), सुप्रीया सुळे (Supriya Sule), सदानंद सुळे आणि अजित गुलाबचंद यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. अजित पवारांनी अधिकाराचा गैरवापर केला तसेच लवासा कॅार्पोरेशनची स्टॅम्प ड्यूटी माफ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. हिल स्टेशन करणे बेकायदा होते. पर्यावरण तसेच इतर नियमांचे उल्लंघन केले आहे असं या याचिकेत नमूद करण्यात आलं आहे.