प्रताप सरनाईक यांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा, ईडीला कारवाई न करण्याचे आदेश
शिवसेनेचे आमदार प्रतास सरनाईक यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे.
दीपक भातुसे / नवी दिल्ली : शिवसेनेचे (Shiv Sena) आमदार प्रतास सरनाईक (Pratap Sarnaik) यांना सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) मोठा दिलासा दिला आहे. प्रताप सरनाईक यांच्यावर कोणतीही कारवाई करु नये, असे आदेश आज सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. प्रताप सरनाईक आणि त्यांचा मुलगा विहंग सरनाईक यांनी ईडीच्या (ED) नोटीसला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
मला ईडीच्या नोटीस (Enforcement Directorate) आलेल्या आहेत, त्यांना तसे पत्राद्वारे उत्तरही पाठवले आहे. ईडी ज्या ज्या वेळी चौकशीला बोलवेल, तेव्हा तेव्हा मी जाईन, असे सरनाईक यांनी म्हटले होते. त्याचवेळी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. दरम्यान, प्रताप सरनाईक आणि त्यांच्या कुटुंबीयांवर कुठलीही कारवाई न करण्याचे आदेश आज सर्वोच्च न्यायालयाने ईडीला दिले आहेत.
दरम्यान, दोन दिवासांपूर्वी प्रताप सरनाईक यांनी भाजप नेत्यांची चौकशी करणार, असा प्रश्न विचार आहे. मंगलप्रभात लोढा, पराग शहा, सुधाकर शेट्टींच्या संपत्तीची चौकशी केली का ? असा प्रश्न सरनाईक यांनी उपस्थित केला. राजस्थानमधून आलेल्या मंगलप्रभात लोढा यांच्या संपत्तीची चौकशी केली का? भाजप आमदार पराग शाहची पाच हजार कोटींची संपत्ती, सुधाकर शेट्टी यांची शेकडो कोटींची संपत्ती, पश्चिम बंगालमधून आलेले अर्णब गोस्वामी एका चॅनेलचे मालक आहेत. हिमाचलमधून आलेल्या आणि मोठ्या संपत्तीची मालक असलेल्या कंगना हिची चौकशी केली का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित होता.
काय म्हणालेत प्रताप सरनाईक?
- ईडीच्या नोटीस आलेल्या आहेत, त्यांना तसं पत्राद्वारे उत्तरही पाठवले आहे. ईडी ज्या ज्या वेळी चौकशीला बोलवेल, तेव्हा तेव्हा मी जाईन. महाराष्ट्र आणि दिल्लीच्या या लढाईत प्रताप सरनाईक योग्यवेळी उत्तर देईल.
- ७०० कोटींची संपत्ती असेल तर या गोष्टीचा मला आनंद आहे. राजस्थानमधून आलेल्या मंगलप्रभात लोढा यांच्या संपत्तीची चौकशी केली का? भाजप आमदार पराग शहांची ५ हजार कोटींची संपत्ती, सुधाकर शेट्टीची शेकडो कोटींची संपत्ती, बंगालमधून आलेले अर्णब गोस्वामी एका चॅनेलचे मालक आहेत.हिमाचलमधून आलेल्या व मोठ्या संपत्तीची मालक असलेल्या कंगनाची चौकशी केली का ?
- मी रिक्षा चालवण्याबरोबर ऑम्लेट पावची गाडीही चालवली, याचा अभिमान आहे.पण गेल्या ३० वर्षात कायद्याचे पालन करून इथवर पोहचलो आहे
- राहूल नंदा, अमित चंडेला यांच्याशी मैत्री आहे, पण व्यावसायिक संबंध नाहीत.
- हे कॉर्पोरेट वॉर आहे. दोन्ही फिर्यादीत माझे नाव नाही.
- महाराष्ट्र, मराठी माणसाच्या विषयी आगपाखड करत असेल तर मी त्याला सोडणार नाही. हीच भूमिका कायम असून याकरता फासावर लटकवले तरी चालेल.
- सत्ता आहे म्हणून बायका मुलांना त्रास देत असाल तर ते योग्य नाही
- हे युद्ध महाविकास आघाड़ी विरूध्द भाजपा असे सुरू आहे. काही भाजपा नेत्यांनाही माहिती आहे की, माझा राजकीय बळी दिला जातोय.
- कुणी कितीही ऑफर दिल्या तरी मी शिवसैनिकच राहीन.
विहंग सरनाईक काय म्हणालेत?
- आमच्यावरील संकट मार्गी लागण्यासाठी सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. सत्य समोर येईल कधी ना कधी.
- माझी पत्नी आजारी असल्यानं मी ईडीला गेलो नाही, तसं उत्तर ईडीला दिले आहे. ते जेव्हा बोलवतील तेव्हा जावू
- काही चुकीचे केले नाही, तर घाबरण्याची गरज नाही. नियमानुसार व्यवसाय केला आहे