COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी छगन भुजबळ यांना जामीन मंजूर झाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली, त्या पहिल्याच शब्दात म्हणाल्या फॅन्टास्टिक...! मी न्य़ायालयाची, वकिलांची सर्वांची आभारी आहे. वैयक्तिकपणे माझ्यासाठी ही समाधानाची बाब आहे. मी कोर्टाची जाहीर, प्रांजळपणे आभार मानणार आहे. भुजबळ हे फक्त राष्ट्रवादीचे नेते नाहीत तर महाराष्ट्राचे नेते आहेत. छगन भुजबळ यांना मी जेलमध्ये भेटले तेव्हा विरोधी पक्षाने आमच्यावर टीका केली. भुजबळ साहेबांशी पवारसाहेबांचे जवळचे आपुलकीचे आणि प्रेमाचे, मित्रत्वाचे संबंध आहेत. भुजबळ साहेब आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत, ते एक टफ नेते आहेत, मी त्यांच्यापुढे म्हणजे लहान तोंडी मोठा घास असं असल्याचं सु्प्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. खालच्या पातळीचं राजकारण न केलेलं बरं...आपल्या महाराष्ट्रात पहिल्यांदा बदल्याचं राजकारण येतंय, आता कुणी केलं असेल तर आता थांबण्याची गरज आहे, अशी माझी सर्व पक्षांना विनंती आहे. सत्ता कुणाकडेचं स्थिर राहत नाही, सत्ता चंचल असते, असं राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.


पहिल्यांदा माणुसकी आणि राजकारण, आम्ही माणसं आहोत,  पवार साहेब आणि भुजबळांचं नातं मित्रत्वाचं आहे, माणुसकीचं आहे नंतर राजकारणाचं आहे, असं सु्प्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. छगन भुजबळ यांना जामीन मिळाल्याच्या बातमीवर सुप्रिया सुळे या भरभरून बोलत होत्या.