मुंबई : ज्येष्ठ कवी, गीतकार, गझलकार सुरेश भट यांच्या स्मृतीदिनानिमित्त 'स्मरण सुरेश भटांचे' या कार्यक्रमाचं आयोजन मुंबईतील दादर माटुंगा कल्चरल सेंटरमध्ये करण्यात आलं होतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संगीतकार कौशल इनामदार, गझलकार प्रदीप निफाडकर, उर्दू शायर संदीप गुप्ते, डॉ. अविनाश सांगोलेकर आणि झी २४ तासचे मुख्य संपादक विजय कुवळेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मनस्वी कवी सुरेश भट यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. त्यांच्या शब्दांची जादू , अस्सल मराठमोळ्या गझलांमधली नजाकतता आजही दर्दी रसिकांच्या आठवणींचा एक अनमोल ठेवा बनली आहे. 


हा ठेवा प्रत्येक नव्या पिढीपर्यंत पोहोचायला हवा, अशी अपेक्षा यावेळी मान्यवरांनी व्यक्त केली.. सुरेश भटांच्या काही निवडक गझला यावेळी सादर करण्यात आल्या.