सुशांतसिंह मृत्यू प्रकरण : ६ तासांपासून सीबीआयची टीम वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये, डीसीपींची चौकशी सुरू
सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी सीबीआयची टीम मुंबईत दाखल झाल्यानंतर चौकशीला वेग आला आहे.
मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई : सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी सीबीआयची टीम मुंबईत दाखल झाल्यानंतर चौकशीला वेग आला आहे. मागच्या ६ तासांपासून सीबीआयची टीम वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये आहे. सीबीआयकडून मुंबई पोलिसांची चौकशी सुरू आहे. सीबीआय अधिकारी नीरजा प्रसाद यांच्याकडून वांद्रे पोलीस स्टेशनचे डीसीपी अभिषेक त्रिमुखे यांची चौकशी सुरू आहे. याप्रकरणाची सगळी कागदपत्र आणि पुरावे सीबीआयने ताब्यात घेतले आहेत.
सुशांतसिंह प्रकरणी सीबीआयच्या तीन टीमकडून चौकशी चालली आहे. एक टीम वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये आहे, तर दुसरी टीम गेस्ट हाऊसमध्ये सुशांतचा नोकर नीरजची चौकशी करत आहे. तिसरी टीम मरोळ येथे सुशांतचा होम मॅनेजर सॅम्युअल मिरांडाची चौकशी करत आहे. दुसरीकडे दिल्लीमध्ये सुशांतची बहिण प्रियंकाची ईडीकडून चौकशी सुरू आहे.
सीबीआय सुशांतच्या पुतळ्याला फासावर चढवणार
सुशांतसिंह राजपूत प्रकरणाची चौकशी सीबीआयला देण्यात यावी, असा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला. यानंतर सीबीआयची टीम मुंबईमध्ये दाखल झाली. सीबीआयच्या अधिकाऱ्यांच्या सोबत फॉरेन्सिक टीम देखील आहे. सुशांतच्या मृत्यूबाबत त्याच्या घरी संपूर्ण घटनेचं रिक्रिएशन केलं जाण्याची शक्यता आहे. सीबीआयची जवळपास १६ सदस्यांची ही टीम असल्याचं कळतं आहे.