सुशांतसिंह प्रकरण : नार्कोटिक्स ब्युरोपुढे कोड डिकोड करण्याचं आव्हान
सुशांत सिंग राजपूत प्रकरणामध्ये नवनवीन खुलासे पुढे येत आहेत.
प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई : सुशांत सिंग राजपूत प्रकरणामध्ये नवनवीन खुलासे पुढे येत आहेत. वेगवेगळ्या अँगलने तपास पुढे सरकत आहे. या प्रकरणात नारकोटिक्स हा देखील अँगल पुढे आला आहे. नारकोटिक्स मध्ये विविध प्रकारची कोड भाषा वापरली जाते. तसंच ड्रग्ज असतात त्यामुळे मानसिक संतुलन बिघडतं? माणूस काहीही करू शकतो? आत्महत्या करू शकतो का ? नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो तपासात काय शोधणार? कोड कोणते असतात ते डी कोड कसे करणार? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
५ ग्राम मम्मी डेडी देना
दो पेकेट काला सोना भेजा है
व्हाईट गर्ल है क्या ?
दो पुडी घास का कितना होगा ?
ड्रग्ज विक्रेते आणि खरेदी करणारे या भाषेचा वापर करतात. मम्मी डेडी, काला सोना, व्हाईट गर्ल हे अमली पदार्थांचे कोड वर्ड आहेत. ह्या भाषेत किंवा वेगळ्या भाषेत व्यवहार केल्यास संशय निर्माण होणार नाही आणि पोलिसांना ते कळणार नाही म्हणून अश्या कोड भाषा वापरल्या जातात. नार्कोटिक मध्ये मम्मी डॅडी म्हणजे एमडी म्हणजे Mephedrone. हा अमली पदार्थ अतिशय अपायकारक आहे. तसंच
काला सोना म्हणजे अफिम , व्हाइट गर्ल - म्हणजे हिरोईन कोकिन ,गावात , ग्रास म्हणजे गांजा , अश्या विविध नावानी हे ड्रग्ज विकले जातात आणि त्याची खरेदी केली जाते.
रिया चक्रवर्ती च्या चॅट मधून ज्या ड्रग बद्धल बोलले जाते ते एम डी म्हणजे Mephedrone. बड्स हॅश हा देखील ड्रग्जचा प्रकार आहे. गांजा च्या तेलाचा वापर नशे साठी केला जातो. चहा किंवा कॉफी किंवा हुक्का मधून त्याचा वापर होतो. जर जास्त प्रमाणात ड्रग्ज चे सेवन झाले तर मात्र तो माणूस स्वतःच्या नियंत्रणात राहत नाही. तसंच तो भ्रमात राहतो आणि मानसिक संतुलन बिघडवून तो काहीही करू शकतो.