मुंबई : सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणावरून आता मुंबई आणि बिहार पोलीस आमने-सामने आले आहेत. दोन्ही राज्यांच्या पोलिसांमध्ये मुंबईत हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. मुंबईमध्ये बिहार पोलिसांचे अधिकारी अंधेरीमध्ये पोलीस उपायुक्तांना भेटायला गेले होते. यानंतर बिहार पोलिसांना मीडियाशी बोलायचं होतं, पण मुंबई पोलिसांनी बिहार पोलिसांना माध्यमांबरोबर बोलू दिलं नाही. तसंच बिहार पोलीस अधिकाऱ्यांना जबरदस्ती पोलिसांच्या गाडीत घालून मुंबई पोलीस घेऊन गेले. 


'सुशांतसिंग प्रकरणात मुंबई पोलिसांवर युवा मंत्र्याचा दबाव', भाजपचा गंभीर आरोप


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज सकाळपासूनच बिहारचे मंत्री मुंबई पोलिसांच्या वागणुकीवर आक्षेप नोंदवत होते. मुंबई पोलीस या प्रकरणाच्या तपासात सहकार्य करत नाहीयेत, असा आरोप बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनी केला होता. 


बिहार पोलीस मुंबईमध्ये डीसीपी असलेल्या अकबर पठाण यांना नोडल एजन्सी म्हणून भेटायला आले होते. पोलिसांबरोबर बिहार पोलिसांचं बोलणंही झालं. बोलणं झाल्यावर बाहेर पडताना समोर मीडियाचा गराडा होता. बिहार पोलीस मीडियाशी बोलणार होते, पण मुंबई पोलिसांनी त्यांना जबरदस्ती गाडीमध्ये टाकलं. 


'लॉकडाऊनमध्ये सुशांतच्या घरी झालेल्या पार्टीची चौकशी करा', शिवसेनेची गृहमंत्र्यांकडे मागणी