मुंबई : विवाह संस्था चालकाने आंतरजातीय जोडप्याचे लग्न लावून दिल्याने  नातेवाईकांनी आणि हिंदु संघटनेच्या कार्यकर्त्यांनी संस्था चालकाला मारहाण करत तोंडाला काळे फासले. हा सर्व प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेनंतर लग्न लावून देणाऱ्या व्यक्तीने तक्रार दिल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत माध्यमांशी बोलताना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस यांना गृहमंत्री पद झेपत नाही असे सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे. (shivsena sushma andhare criticizes Devendra Fadnavis after meet sanjay raut)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"कुठे काळं फासलं जातं, कुठे महिलांविषयी गरळ ओकली जातेय त्यामुळे याबाबत फक्त देवेंद्र फडणवीस यांनाच प्रश्न विचारला जातोय. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात गृहमंत्रालय नावाची गोष्ट अस्तित्वात आहे का? देवेंद्र फडणवीसांवर कामाचा भार खूप आहे. त्यामुळे मला त्यांची काळजी वाटते. त्यांच्याकडे सहा जिल्ह्यांचे गृहमंत्री पद, मंत्री पद, उपमुख्यमंत्री पद आहेत त्यामुळे माणसाने किती काम करायचं? त्यांचा थोडा कामाचा भार कमी केला पाहिजे. त्यांना गृहमंत्री पद झेपत नाही हे लक्षात येतय. त्यांनी ते दुसऱ्याकडे द्यायला हवं. कारण त्यांच्या कारर्किदीत होत असलेल्या वक्तव्यांवर असू बोलू नये असं गुळगुळीत वक्तव्य ते करतात," अशी टीका सुषमा अंधारे यांनी केलीय.


बीकेसीतल्या मेळाव्यात करोडो रुपयांचा चुराडा केला त्याचा हिशोब कधी देणार? 


खासदार संजय राऊत यांची भेट घेतल्यानंतर सुषमा अंधारे ईडीच्या कामकाजावरही टीका केली. "ईडीची आता खरोखरच गरज आहे यावर आता संशोधन व्हायला हवं. जे लोक संजय राऊत यांच्या मुलीच्या लग्नातील मेहंदीवाल्याचा हिशोब मागतात. ते लोक बीकेसीतल्या मेळाव्यात करोडो रुपयांचा चुराडा केला त्याचा हिशोब कधी देणार आहेत? बीकेसीतल्या मेळाव्यात जो पक्ष नोंदणीकृत नाही त्यांच्यासाठी खर्च कोणत्या खात्यातून झाला यावर किरीट सोमय्या का बोलत नाही?


" असा सवाल सुषमा अंधारे यांनी विचारला आहे.