वॉलमार्टला स्वदेशी मंचाचा तीव्र विरोध
स्वदेशीने वॉलमार्टला केला कडाडून विरोध
मुंबई : भारतात आतपर्यंतच्या सर्वात मोठ्या थेट परदेशी गुंतवणूकीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या परिवारातल्या स्वदेशी जागरण मंचानं तीव्र विरोध केलाय. आज विरोध करण्यासाठी दिल्लीत मंचाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली. १ लाख कोटींच्या वॉलमार्ट फ्लिपकार्ट विलीनीकरणाच्या व्यवहारमुळे छोट्या दुकानदारांना मोठा फटका बसेल. भारतात रिटेल क्षेत्रात थेट परदेशी गुंतवणूकीवर निर्बंध आहेत. हे निर्बंध धाब्यावर बसवून वॉलमार्ट ही जगातली सर्वात मोठी रिटेल कंपनी फ्लिपकार्टच्या माध्यमातून भारतात छुपा प्रवेश करतेय असा आरोप स्वदेशी जागरण मंचानं केलाय.