कृष्णात पाटील, झी २४ तास, मुंबई : मुंबईत आता कोरोनाचा धोका आता थोडा कमी होतोय. पण तेवढ्यातच मुंबईला आता एक वेगळी लढाई लढावी लागणार आहे. कोरोनाची तिसरी लाट येण्याचा अंदाज असतानाच आणखी एक नवा धोका निर्माण झालाय तो म्हणजे स्वाईन फ्लूचा. एच१ एन१ म्हणजेच स्वाईन फ्लूचे रूग्ण मुंबईत मिळू लागलेत. या दोन्ही आजारांची लक्षणं सारखीच आहेत.


मुंबईवर आता स्वाईन फ्लूचं संकट 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्वाईन फ्लू हा आजार इन्फ्ल्युएंझा H1N1 या विषाणूपासून होतो. सर्दी, घशात खवखव, ताप, अंगदुखी ही कोरोनासारखीच या आजाराचीही लक्षणे आहेत. डायबिटीस, बीपी, कर्करोग, दमा, फुप्फुस- मूत्रपिंडांचे आजार इतर आनुवंशिक आजार असणा-या व्यक्तींमध्ये तसंच लहान मुले आणि गर्भवती मातांमध्ये हा आजार गंभीर रुप धारण करताना दिसतो. 


याचा संसर्ग रोखण्यासाठीही मास्कचा वापर गरजेचा आहे.  एच१ एन १ - गेल्या वर्षीच्या तुलनेत सध्याच्या केसेस कमी आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत  यावेळी ५०% पेक्षा कमी केसेस समोर आले आहेत. 


दरवर्षी पावसाळ्यात स्वाईन फ्लूचे रुग्ण वाढतात. कोरोनावर अजूनही ठोस औषध नसलं तरी स्वाईन फ्लूवर औषध आहे. त्यामुळे घाबरुन जाऊ नका.