मुंबई : लोकलसंदर्भात दोन दिवसांत निर्णय घ्या अन्यथा आंदोलन करणार, असा इशारा रेल्वे प्रवासी संघटनेने दिला आहे. दरम्यान, रेल्वेकडूनच त्रुटी काढल्या जात असल्याचा मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आरोप केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सर्व सामान्यांसाठी लोकल सुरू न झाल्यास सर्व रेल्वे प्रवासी संघटना दोन दिवसांनंतर आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. तर  मुंबईकरांच्या संयमाची प्रतिक्षा पाहु नका अन्यथा मुंबईकर रुळावर उतरेल, अशी प्रतिक्रिया लोकल प्रवाशांकडून देण्यात आली आहे. सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरू करण्याबाबत मुंबईकर आक्रमक झाले आहेत. 


सर्व सामान्यांसाठी लोकल सुरू न झाल्यास सर्व रेल्वे प्रवासी संघटना दोन दिवसानंतर आंदोलन करणार आहे. लोकल बंद असल्याने सर्व सामन्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. रेल्वे आणि राज्य सरकारने बैठक घेऊन त्वरित लोकल सुरू करण्याची मागणी करुनही लोकप्रतिनिधी आणि सरकार या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहत नाही, असा आरोप प्रवासी संघटनेने केला आहे.


दरम्यान, राज्य सरकारकडून रेल्वेकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. मात्र, रेल्वेकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप राज्य सरकारकडून करण्यात आला आहे. आम्ही पत्रही पाठवले आहे. परंतु रेल्वे काहीही निर्णय घेत नाही, असा थेट आरोप मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. तर दुसरीकडे रेल्वेने आम्ही रेल्वे सुरु करण्याबाबत राज्य सरकारला बैठक घेण्याबाबत सांगितले आहे, असे सांगत आपल्यावरील जबाबदारी झटकण्याचे काम केले आहे.