मुंबई : येत्या ४८ तासांत ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. उद्या मुंबईत मुसळधार पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. पुढील ४८ तास पावसाची स्थिती अशीच राहील, असा इशारा हवामानाखात्यानं दिला आहे. दरम्यान, उद्या श्रावण सुरु होण्याआधीचा रविवार असल्यानं पर्यटक मोठ्या प्रमाणात कोकण, लोणावळा आदी ठिकाणी धबधबे आणि पर्यटनस्थळांवर जाण्याची शक्यता आहे. पर्यटकांनीही सतर्क राहणे गरजेचं आहे. त्यामुळे उद्या पर्यटनाला जाणाऱ्यांनो स्वतःची काळजी घ्या, असे आवाहन करण्यात आले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

येत्या २४ तासात कोकणात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने दिलीय. रत्नागिरी, रायगडमध्ये मुसळधार पावसाचा नवा अंदाज देण्यात आलाय. त्यामुळे पावसाळी पिकनीकला जाताना आणि अशा ठिकाणी उद्या आगाऊ गटारी साजरी करताना काळजी घ्या. उद्या श्रावण सुरु होण्याआधीचा रविवार असल्यानं पर्यटक मोठ्या प्रमाणात कोकण, लोणावळा आदी ठिकाणी धबधबे आणि पर्यटनस्थळांवर जाण्याची शक्यता आहे. 


भावली, भूशी डॅमसह अनेक ठिकाणी पावसामुळे धबधबेही ओसंडून वाहात आहेत. त्यातच मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिल्यानं या ठिकाणी गेल्यास पर्यटकांनी अतिउत्साह टाळायला हवा. पर्यटकांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन प्रशासन आणि पोलीस यंत्रणा सज्ज आहे.