Tata Technologies IPO Listing: शेअर बाजारामध्ये आज टाटा ग्रुपच्या टाटा टेक्नोलॉजीस कंपनीचा आयपीओ लागलेल्यांनी दिवाळी साजरी केली असं म्हणता येईल. टाटा टेक्नोलॉजीसची दमदार लिस्टींग शेअर बाजारात झाली आहे. बीएसईवर शेअर 1199 रुपयांच्या दरावर लिस्ट झाला. या शेअर इश्यू प्राइज 500 रुपये होती. एनएसईवर शेअर 1200 रुपयांना लिस्ट झाला आहे. म्हणजेच एक्सचेंजवर लिस्ट झाल्यानंतर गुंतवणुकदारांना 140 टक्के नफा मिळाला आहे. यापूर्वी या आयपीओला रेकॉर्ड ब्रेक डिमांड असल्याने प्रिलिस्टींगचाही विक्रम नोंदवला होता. टाटा ग्रुपची कंपनीचा आयपीओ जवळपास 20 वर्षांनी बाजारात आला आहे. गुंतवणूकदारांच्या या आयपीओवर अगदी उड्या पडल्याचं पाहायला मिळालं. मार्केट गुरु अनिल सिंघवी यांनी लाँग टर्म गुंतवणूकदारांनी पोर्टफोलिओमध्ये हा शेअर ठेवावा असा सल्ला दिला आहे.


हा शेअर ठेवावा की विकावा? तज्ज्ञ काय सांगतात?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनिल सिंगवी यांनी टाटा टेक्नोलॉजीसच्या आयपीओसंदर्भात विचार करताना मोठ्या प्रमाणात परतावा मिळवण्याच्या दृष्टीने आणि दिर्घकालीन गुंतवणूक म्हणून या शेअरकडे पाहा असं म्हटलं आहे. शॉर्ट टर्मसाठी ट्रेडर्सने 875 रुपयांच्या स्टटॉपलॉस लावावा, असा सल्ला त्यांनी दिला आहे. दिर्घकालीन गुंतवणुकदार 2 ते 3 वर्षांसाठी हा शेअर आपल्या पोर्टफोलिओमध्ये ठेऊ शकता. मागील अनेक दिवसांपासून या आयपीओची शेअर बाजारामध्ये चर्चा होती. सोशल मीडियावरही या आयपीओची चांगलीच चर्चा दिसून आली. ट्विटरवरही मागील 2 दिवसांपासून या आयपीओचीच चर्चा दिसून आली. 


सर्वाधिक अर्ज


टाटा टेक्नोलॉजीसचा आयपीओ गुंतवणुकदारांसाठी 22 ते 24 नोव्हेंबरदरम्यान बंद झाला. टाटा ग्रुपच्या कंपनीचा आयपीओ अंतिम दिवशी 70 टक्के सबस्क्राइब झाला आहे. यासाठी 73.6 टक्के अर्ज आले आहेत. हे कोणत्याही आयपीओसाठी आलेले सर्वाधिक अर्ज आहेत. आयपीओमध्ये क्यूआयबीसाठी रिझर्व्ह हिस्सा 203.41 टक्के भरला. 


Tata Tech IPO Listing Profit


इश्यू प्राइज: 500 रुपये
लिस्टिंग प्राइज: 1199.95
लॉट साइज: 30 शेअर
लिस्टिंग प्रॉफिट: 21000 रुपये/ लॉट


Tata Technologies IPO: महत्त्वाच्या गोष्टी


IPO तारीख: 22 से 24 नोव्हेंबर 
इश्यू प्राइस : 500 रुपये/ शेअर 
इश्यू साइज: 3042.5 कोटी रुपये  
लॉट साइज: 30 शेअर
सब्सक्रिप्शन: 69.43 टक्के


बिगरसंस्था गुंतवणूक म्हणजेच एआयआयची भागीदारी 62.11 टक्क्यांपर्यंत भरली. रिटेल गुंतवणूकदारांची कॅटेगरी 16.50 टक्के सबस्क्राइब झाली. शेअर बीएसई आणि एएनसईवर 5 डिसेंबर रोजी लिस्ट होणार आहे.