मुंबई : देशाची आघाडीची आयटी कंपनी टीसीएसच्या चौथ्या तिमाही चांगलाच फायदा झाला आहे. यामुळे शेअर धारकांची देखील चंगळ आहे. कारण प्रत्येक शेअरल डिव्हिडंट बोनस देण्याची घोषणा कंपनीने केली आहे. प्रतिशेअर २९ रूपये बोनस दिला जाणार आहे. कंपनीला ६ हजार ९०४ कोटी रूपयांचा फायदा झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीसीएसचा फायनल एअर २०१८चा चौथ्या तिमाहीचा फायदा ५.७१ टक्के वाढला आहे. या दरम्यान कंपनीला ६ हजार ९०४ कोटी रूपयांचा फायदा झाला आहे. या तिमाही अहवालात टीसीएसचा स्टॉक ५२ हफ्त्यात सर्वात जास्त आहे. बीएसई स्टॉकमध्ये देखील ४ टक्क्याने तेजी आली आहे.


आर्थिक वर्ष २०१८ च्या चौथ्या तिमाहीत टीसीएसचा फायदा ३.७८ टक्के वाढला आहे. टीसीएसचं उत्पन्न ३.७८ ने वाढून ३२ हजार ७५ कोटी रूपयांवर जावून पोहोचले आहे. तिसऱ्या तिमाहीत कंपनीचं उत्पन्न ३० हजार ९०४ कोटी रूपये होतं. आर्थिक वर्ष २०१७ च्या तिमाहीत टीसीएसचं उत्पन्न २९ हजार ६४२ कोटी रूपये होतं.


1:1 च्या रेशोमध्ये बोनस शेअर


टीसीएसने प्रति शेअर २९ रूपये शेअर फायनल डेव्हिडेंट बोनस देण्याची घोषणा केली आहे.
टीसीएसने शेअर धारकांना 1:1 रेशोने बोनस शेअर देण्याची घोषणा केली आहे.
कंपनीचा डॉलर महसूल 3.86 टक्के कमी होऊन, 497.२ कोटी झाला आहे.