मुंबई : भारतीय संस्कृतीत लहान ज्येष्ठांना नमस्कार करून त्यांचा आशिर्वाद घेतात. शिक्षकांनाही भारतात गुरूचा दर्जा आहे. पण मुंबईतील एका शाळेत याच्या उलट घडताना दिसतं. या शाळेत शिक्षकच विद्यार्थ्यांना नमस्कार करतात. ऋषिकुल गुरूकुल विद्यालयाचे हे चित्र रोज सकाळी पहायला मिळतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतात लहान मुलांना देवासमान मानले जातात. त्यामुळे त्यांना नमस्कार करणे म्हणजे देवाला नमस्कार केल्यासारखेच आहे. ही यामागची भावना आहे. या पद्धतीमुळे मुलांच्या मनातही शिक्षकांबद्दल आदराची भावना निर्माण झाली आहे.


मुंबईतील घाटकोपरमध्ये ही शाळा आहे. पारंपरिक संकल्पनेला छेद देत या शाळेने एक वेगळा उपक्रम राबविला असल्याचे या निर्णयावरून दिसून येत आहे.