मुंबई : शिक्षकांसाठी (Teachers) एक चांगली बातमी आहे. उद्यापासून राज्यात ऑनलाईन शाळा, महाविद्यालयने सुरु होत आहेत. त्यामुळे काही शिक्षकांना शाळेत जावे लागणार आहे. मात्र, अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांव्यतीरिक्त मुंबई लोकलमधून (Mumbai Local Train ) प्रवासाची मुभा नाही. आता शिक्षकांना मुंबई लोकल प्रवासाची परवानगी मिळण्याची शक्यता आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शिक्षकांना परवानगी देण्याची ग्वाही दिली आहे. त्यामुळे त्यांना प्रवासाबाबत मोठा दिलासा मिळणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना लोकल ट्रेनमधून प्रवास करण्याची परवानगी मिळणार, असे आश्वासन आज शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शिक्षक भारतीच्या शिष्टमंडळाला दिले. आमदार कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक भारतीच्या शिष्टमंडळाने शिक्षणमंत्र्यांची मंत्रालयात भेट घेतली. त्यावेळी त्यांनी रेल्वे अधिकारी यांच्याशी बोलून आजच याबाबत पत्र निघेल, असेही आश्वासन दिले आहे. त्यामुळे शिक्षकांना आता मुंबई लोकल प्रवासाची परवानगी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 



दरम्यान, सर्वसामान्यांना मुंबई लोकल कधी सुरु होणार, याबाबत आज राज्य सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. जोपर्यंत मुंबई लेव्हल 1वर आल्याशिवाय सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू होणार नाही, अशी माहिती मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. मुंबई सध्या लेव्हल 3वर आहे. मुंबई आणि ठाण्यामध्ये जास्त काळजी घेतली जात असल्याचेही ते म्हणालेत. त्यामुळे लोकल सुरु होण्यात किमान अजून एक महिना तरी लागू शकतो, असेच संकेत मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत.