मुंबई : सारा तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर पुन्हा चर्चेत आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धमकावणे आणि किडनॅप करण्याचं प्रकरण सारा तेंडुलकरच्या बाबतीतलं नुकतच घडलं असताना आता पुन्हा एकदा सारा तेंडुलकर चर्चेत आली आहे. सारा तेंडुलकरच्या नावे फेक अकाऊंट ओपन करून राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह ट्विट केल्याचं प्रकरण घडलं आहे. 


सायबर पोलिसांनी याप्रकरणी 39 नितीन आत्माराम सिसोदे याला अटक केली आहे. नितीन सिसोदेला पोलिसांनी अंधेरी येथील लोकसरिता अर्पाटमेंटमधील फ्लॅटमधून अटक केली. सारा सध्या शिक्षणासाठी लंडनमध्ये असते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे पाच महिन्यांपूर्वी नितीनने गुगलवरून साराचा फोटो डाऊनलोड केला. त्यानंतर तिच्या नावाने एक बनावट ट्विटर अकाऊंटही सुरू केले.


इतकेच नव्हे तर ९ ऑक्टोबर २०१७ रोजी याच बनावट अकाऊंटवरून त्याने एक ट्विट केले, यामध्ये शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह लिहिले होते. दरम्यान, त्या कालावधीत सारा ही लंडनमध्ये होती, त्यामुळे सचिनच्या सचिवाने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. भरपूर चौकशी केल्यानंतर सायबर पोलिसांनी या मोबाईल नंबरचा आयएमईआय नंबरला ट्रेस केलं आहे. पोलिसांनी इंटरनेट प्रोटोकॉल म्हणजे आयपी अॅड्रेस लोकेट करून नितिनच्या घरी पोलीस पोहोचले.