मुंबई : ही बातमी आहे आजच्या 'सामना'च्या पहिल्या पानावरच्या जाहिरीतीची...विद्यापीठ अधिसभेवर युवासेनेनं मिळवलेल्या विजयानंतर आज आदित्य ठाकरेंचं अभिनंदन करणारी जाहिरात सामना मधून छापण्यात आलीय. जाहिरातीचं वैशिष्ट म्हणजे या जाहिरातीत बाळासाहेब ठाकरेंच्या छायाचित्राच्या खाली तेजस ठाकरेंचं छायाचित्र लावण्यात आलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

युवासेनेच्या विजया बद्दल मिलिंद नार्वेकर यांनी  " सामना " मध्ये ही जाहीरात दिलीय.....आणि या जाहिरातीतून आणखी एक ठाकरे राजकारणाच्या उंबरठ्यावर आहे की काय अशी जोरदार चर्चा सुरू झालीय. 


मुंबई विद्यापीठात युवासेनेचा भगवा


मुंबई विद्यापीठाच्या अधिसभा निवडणूकीत आदित्य ठाकरेंच्या युवसेनेनं आपलं वर्चस्व कायम ठेवलंय. सगळ्याच जागांवर विजय मिळवत युवासेननं प्रमुख प्रतिस्पर्धी अभाविपचा सुपडा साफ केलाय. याआधीच्या अधिसभेत युवासेनेचे ८ आणि अभाविपचे दोन प्रतिनिधी होते. यंदा मात्र सर्व दहाच्या दहा जागांवर युवासेनेचे उमेदवार विजयी झालेत.