Mumbai in Hot : मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी. मुंबई तापत असल्याचे दिसून येत आहे. मुंबई देशातील सर्वात उष्ण शहर ठरले आहे. (Mumbai City Hot) ऐन हिवाळ्यात मुंबईत सर्वाधिक तामानाची नोंद झाली आहे. सलग दोन दिवस सांताक्रूझमध्ये 35 अंश तापमानाची नोंद झाली आहे. (Mumbai hottest in Maharashtra) पुढील काही दिवसात तापमानात आणखी वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी. भरपूर पाणी प्यावे, असं आवाहन करण्यात आले आहे.


 मुंबईत शुक्रवारी पारा लक्षणीय वाढला


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संपूर्ण महाराष्ट्रात दिवसाच्या सर्वाधिक तापमानाची नोंद मुंबईत झाल्याने शुक्रवारी पारा लक्षणीय वाढला. (Mumbai weather ) IMDच्या माहितीनुसार, शहराचे कमाल तापमान 35.6 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. गुरुवारी शहरात 34.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, जी संपूर्ण राज्यात सर्वाधिक आहे. तर रत्नागिरीत 35.4 अंश सेल्सिअस, त्यानंतर पुणे (32.3) आणि डहाणू (31.8) तापमानाची नोंद झाली. तर दुसरीकडे शुक्रवारी, IMD च्या सांताक्रूझ वेधशाळेने मुंबईचे किमान तापमान 23 अंश सेल्सिअस नोंदवले, जे सामान्यपेक्षा चार अंशांनी जास्त होते.


 मुंबईच्या तापमानात वाढ होण्याची शक्यता


अरबी समुद्रातील बदलामुळे मुंबईला ढगांचे आच्छादन दिसून येत आहे. परिणामी किमान आणि कमाल तापमानात वाढ झाली आहे. तथापि, शहराला दोन ते तीन दिवसांत ईशान्येकडील वारे वाहतील, ज्यामुळे तापमानात घट होईल, असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. 


सलग दोन दिवस सांताक्रुझ वेधशाळेने सर्वाधिक तापमानाची नोंद केली आहे. आणखी काही दिवस मुंबईच्या तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या आरोग्यकडे लक्ष द्यावे. तापमानात वाढ होणार असल्याने जास्त पाणी पिण्याचा सल्ला देण्यात आला आहे.