मुंबई : Terrorist Attack News : देशात दहशतवादी हल्ल्यासाठी पाकिस्तानकडून खूप मोठा कट रचला जात होता. हा नापाक कट दिल्ली पोलीस आणि उत्तर प्रदेश एटीएसने मिळून उघड केला. दहशतीचे अंडरवर्ल्ड कनेक्शन पुढे आल्याने चिंता व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Maharashtra Home Minister Dilip Walse Patil) यांनी मुंबई पोलीस आयुक्तांसह इतर अधिकाऱ्यांशी चर्चा संध्याकाळी करणार आहेत. दरम्यान, याबाबत एटीएस प्रमुख आज दुपारी 3 वाजता पत्रकार परिषदेत तुमच्याशी अधिक माहिती शेअर करतील, असे त्यांनी स्पष्ट केले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिलीप वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, आज सकाळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी याबाबत भाष्य केले आहे. या प्रकरणाची माहिती घेण्याच्या संदर्भात ही बैठक बोलावली होती. हे प्रकरण देशपातळीवरचे आहे. त्यामुळे या बैठकीमध्ये सविस्तर चर्चा करुन माहिती घेतली गेली आहे. तीन वाजता यावर भाष्य केले जाईल, असे ते म्हणाले. संध्याकाळी 5 वाजता अधिकाऱ्यांसोबत बैठक होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.



काही दहशतवादी संशयितांना दिल्ली आणि देशाच्या इतर भागातून अटक करण्यात आली आहे. राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव (गृह), मुंबई पोलीस आयुक्त, एटीएस प्रमुख आणि सर्व अधिकाऱ्यांसोबत बैठक होणार आहे. ते मला सर्व आवश्यक माहिती देतील, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.



दहशतवाद्यांची ओळख


 महाराष्ट्रातील रहिवासी जन मोहम्मद शेख 47 वर्षांचे आहेत. 22 वर्षीय ओसामा हा जामिया नगर दिल्लीचा रहिवासी आहे. 47 वर्षीय मूलचंद इलियास लाल यूपीच्या रायबरेलीचा रहिवासी आहे, तर 28 वर्षीय जीशान कमर प्रयागराजचा रहिवासी आहे. पाचवा संशयित अबू बकर मोहम्मद हा उत्तर प्रदेशातील बहराइच जिल्ह्यातील रहिवासी आहे. ते गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत राहत होते. मोहम्मद अमीर जावेद (31) हा लखनऊचा रहिवासी आहे.


हे तेच 6 लोक आहेत जे देशात दहशत पसरवण्याचे मोठे षड्यंत्र राबवणार होते, पण आता त्यांचे दहशतवादी षड्यंत्र उघड झाले आहे आणि आता ते सर्व पोलिसांच्या ताब्यात आहेत. पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय आणि डी कंपनी दहशतवादाच्या या दहशतवादी मॉड्यूलमागे आहेत.


दिल्ली-मुंबई हादरवण्यासाठी 'प्लॅन-डी'


दिल्ली पोलिसांच्या विशेष सेलने मंगळवारी उघड केले की, अटक केलेले सहाही दहशतवादी देशात वेगवेगळ्या स्फोटांची योजना आखत होते. महाराष्ट्रातील एका दहशतवाद्याला राजस्थानमधून अटक करण्यात आली तर दोन दहशतवाद्यांना दिल्लीतून पकडण्यात आले. 


यूपीमधून 3 दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. म्हणजेच त्यांच्या तारा देशाच्या एका राज्यातून नाही तर महाराष्ट्र, राजस्थान ते दिल्ली आणि यूपी पर्यंत पसरलेल्या आहेत. एडीजी (यूपी) प्रशांत कुमार यांनी सांगितले की त्यांच्याकडून 2 आयईडी जप्त करण्यात आले आहेत. ज्यामध्ये 1 किलो आरडीएक्स वापरला गेला. याशिवाय 2 हँड ग्रेनेड देखील सापडले आहेत.