अंकुर त्यागी, झी मीडिया, मुंबई : मायानगरी मुंबई कायमच दहशतवाद्याचं पहिलं टार्गेट राहिली आहे. मुंबईवर हल्ला करण्यासाठी दहशतवाद्यांनी कधी सागरीमार्गाचा वापर केलाय तर कधी स्लिपर सेलचा. मात्र यावेळी दहशतवादी हल्ल्याचा एक वेगळाच कट शिजतोय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईवर ड्रोन हल्ल्याची भीती
मुंबईवर ड्रोन हल्ला होण्याची भीती व्यक्त होत आहे. डार्क नेटवर दहशतवाद्यांची आणि काही विशिष्ट विचारसणीच्या लोकांचं चॅट पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्यातून ही माहिती समोर आली आहे. यातील काही ड्रोन हल्ले हे 20 ते 30 किलोमीटरवर मारा करणाऱ्या ड्रोनच्या माध्यमातून होण्याची भीती आहे. 


धक्कादायक संभाषण पोलिसांच्या हाती
विशेष म्हणजे ड्रोनवर विविध प्रकारचे पेलोड लावून हल्ला होण्याचा संशय आहे. डार्क नेटवर सातत्यानं ड्रोन अटॅक, केमिकल अटॅक, सायबर हल्ले याविषयीचं चॅट सुरू असल्याचं संभाषण सायबर पोलिसांच्या हाती लागलं आहे. गंभीर बाब म्हणजे असा हल्ला झाला तर त्याचा मुकाबला करण्यासाठी कोणतीही अँटी ड्रोन सिस्टीम मुंबईत नाही. 


डार्क वेब म्हणजे काय? 
डार्क वेब म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आपण वापरत असलेल्या इंटरनेटचा छुपा भाग आहे. आपण जे इंटरनेट वापरतो ज्या वेबसाइटला भेट देतो त्या सर्व सरफेस वेबसाइट्स या नावानं ओळखल्या जातात. त्या साईड गुगलवर इंडेक्स होतात. डार्क वेबवर सहजासहजी कोणालाही प्रवेश करता येत नाही. डार्कनेट वापरासाठी टॉर नावाचा वेब ब्राऊझर वापरला जातो. डार्कनेट वेबसाईटचा वेब अॅड्रेस हा वेगळा असतो. विविध डार्कनेट टूल्सचं काम वेगवेगळ्या पद्धतीनं चालतं. 


दहशतवादी कसाब आणि त्याच्या साथीदारांनी मुंबईवर केलेला 26/11चा हल्ला मुंबईकर विसरलेले नाहीत. त्यामुळे ड्रोन हल्ल्याच्या बातमीनं मुंबईसह महाराष्ट्राची चिंता वाढलीय. दहशतवाद्यांच्या या गुप्त चॅटमुळे सर्व तपासयंत्रणा पुन्हा एकदा अलर्ट झाल्या आहेत.