मुंबई: ठाकरे सरकारचा बहुचर्चित मंत्रिमंडळ विस्तार अखेर सोमवारी पार पडला. विधिमंडळाच्या प्रांगणात पार पडलेल्या या सोहळ्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ३६ आमदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. ठाकरे सरकारच्या या नव्या मंत्रिमंडळावर नजर टाकल्यास त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्राचे वर्चस्व स्पष्टपणे दिसून येत आहे. पश्चिम महाराष्ट्राला एकूण १० मंत्रिपदे देण्यात आलेली आहेत. फडणवीस सरकारच्या काळात सहकार आणि अन्य संस्थांमध्ये असलेले काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे वर्चस्व पद्धतशीरपणे मोडून काढण्याचे प्रयत्न झाले होते. त्यामुळे नव्या मंत्रिमंडळात पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांना संधी देऊन आपला बालेकिल्ला पुन्हा भक्कम करण्याचा काँग्रेस-राष्ट्रवादीचा प्रयत्न असू शकतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पश्चिम महाराष्ट्रापाठोपाठ विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात मंत्रिपदांची संख्या जास्त आहे. तर मुंबई महानगरपालिकेची आगामी निवडणूक ध्यानात ठेवून शहरातील ७ आमदारांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. तर राज्यातील १२ जिल्ह्यांमध्ये एकही मंत्रिपद देण्यात आलेले नाही. त्यामुळे आगामी काळात ठाकरे सरकार हा प्रादेशिक असमतोल कसा साधणार, हे पाहणेदेखील महत्वाचे ठरेल. 



मुंबई-७
उद्धव ठाकरे
सुभाष देसाई
अनिल परब
वर्षा गायकवाड
अस्लम शेख
नवाब मलीक
अदित्य ठाकरे


ठाणे व कोकण-४
एकनाथ शिंदे
जितेंद्र आव्हाड
उदय सामंत
अदिती तटकरे


पश्चिम महाराष्ट्र-१०
अजित पवार
वळसे पाटील
दत्ता भरणे
बाळासाहेब पाटील
शंभुराज देसाई
जयंत पाटील
विश्वजित कदम
हसन मुश्रीफ
सतेज पाटील
राजेंद्र यड्रावकर


मराठवाडा-७
राजेश टोपे
अशोक चव्हाण
धनंजय मुंडे
अमित देशमुख
अब्दुल सत्तार
संदिपान भुमरे
संजय बनसोडे


विदर्भ-८
नितीन राऊत
वडेट्टीवार
अनिल देशमुख
सुनिल केदार
यशोमती ठाकूर
बच्चू कडू
राजेंद्र शिंगणे
संजय राठोड


उत्तर महाराष्ट्र-७
के. सी. पाडवी
गुलाबराव पाटील
दादा भुसे
छगन भुजबळ
बाळासाहेब थोरात
शंकरराव गडाख
प्राजक्त तनपुरे


मंञीपद न मिळालेले जिल्हेः
पालघर
सिंधुदूर्ग
सोलापूर
धुळे
परभणी
हिंगोली
वाशिम
अकोला
वर्धा
गोंदिया
भंडारा
गडचिरोली