मुंबई: मेट्रो-३ च्या माजी संचालिका अश्विनी भिडे यांच्यावर आता राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविली आहे. सरकारने त्यांच्याकडे कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी तयारी करण्यात आलेल्या वॉर रुमची सूत्रे सोपविली आहेत. त्यानुसार अश्विनी भिडे यांच्याकडे कोरोनाशी संबंधित नियोजनात्मक आणि प्रतिबंधात्मक उपाय योजण्याचे काम असेल. याशिवाय, या वॉर रूमच्या माध्यमातून राज्यभरातील कोरोनाच्या प्रादुर्भावावर बारकाईने लक्ष ठेवण्यात येईल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

होम क्वांरटाईन केलेल्या लोकांचे मोबाईल होणार ट्रॅक

फडणवीस सरकारच्या काळात अश्विनी भिडे या मेट्रो-३ प्रकल्पाच्या व्यवस्थापकीय संचालक होत्या. मात्र, आरे परिसरातील कारशेडमुळे मेट्रो-३ ला मोठा विरोध झाला होता. या कारशेडसाठी आरे कॉलनीतील हजारो वृक्षांची कत्तल झाली होती. मात्र, या संपूर्ण काळात अश्विनी भिडे आरेमध्येच मेट्रोची कारशेड बांधण्याच्या भूमिकेवर ठाम राहिल्या होत्या. 


हा तर मोदींच्या 'देवत्वा'चा पराभव; शिवसेनेचा भाजपला टोला

विधानसभा निवडणुकीवेळी हा मुद्दा चांगलाच तापला होता. त्यावेळी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी आमची सत्ता आल्यावर आरेमध्ये वृक्षांची कत्तल करणाऱ्यांवर कारवाई करू, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार राज्यात महाविकासआघाडीची सत्ता स्थापन झाल्यानंतर अश्विनी भिडे यांना पदोन्नती देऊन  मेट्रो-३ प्रकल्पाच्या संचालकपदावरून दूर करण्यात आले होते. मात्र, आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अश्विनी भिडे यांच्यावर विश्वास दाखवत त्यांच्याकडे वॉर रूमची जबाबदारी सोपविली आहे.