Andheir Bypoll Election : अंधेरी पोटनिवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटानं (Thackeray Group) दिवंगत आमदार रमेश लटके (Ramesh Latke) यांच्या पत्नी ऋतुजा लटकेंची (Rutuja Latke) उमेदवारी जाहीर केली. मात्र मुंबई महापालिका (Mumbai Municipal Corporation) सेवेत असलेल्या लटकेंचा राजीनामा महापालिका प्रशासनानं वेळेत मंजूर केला नव्हता. अखेर लटकेंच्या उमेदवारीसाठी मुंबई हायकोर्टात (Mumbai High Court) धाव घेण्याची वेळ ठाकरे गटावर आली. हायकोर्टानं आता लटकेंना दिलासा देणारा निर्णय दिलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हायकोर्टानं काय आदेश दिला?
उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत लटकेंचा राजीनामा मंजूर करा 
'एक कर्मचारी निवडणूक लढवतोय, एवढा इश्यू का?'
महापालिका आयुक्तांनी राजीनामा मंजुरीबाबत स्पष्ट उत्तर द्यावं, असे आदेश हायकोर्टानं मुंबई महापालिकेला दिलेत.


14 ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस आहे. राजीनामा मंजूर झाल्यानंतर लटके आता अंधेरीच्या मैदानात उतरणार आहेत.


लटकेंना उमेदवारी अर्ज भरताच येऊ नये, यासाठी शिंदे सरकारनं (Shinde Government) फिल्डिंग लावल्याचा आरोप ठाकरे गटाकडून केला जातोय. त्यावरून पुन्हा राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झालेत.


शिवसेना ठाकरे गटाची चारी बाजूंनी कोंडी करण्याचं राजकारण सध्या सुरूय. आधी दसरा मेळाव्याला (Dussehra Rally) शिवाजी पार्क (Shivaji Park) मिळू नये, यासाठी कोर्टबाजी झाली. शिवसेना (Shivsena) नाव आणि धनुष्य बाणाची लढाई सुरूच आहे. आता अंधेरी पोटनिवडणुकीतील उमेदवाराच्या राजीनाम्यावरून वाद झाला.हायकोर्टानं लटकेंना दिलासा दिल्यानं ठाकरेंनी पहिली लढाई तर जिंकलीय. पण अंधेरीचं रणमैदान कोण जिंकतं, याकडं आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.