ठाणे : आईच्या नकळत दिवाळीचे कपडे घ्यायच्या हट्टाने निघालेली ठाण्यातली लहानगी वैष्णवी सांगवेकर हरवली होती. या घटनेमुळे घरच्यांना तर फारच त्रास झाला होता. सगळीकडे चौकशी करून झाल्यानंतर त्यांनी यासंदर्भात पोलिसांतही तक्रार केली होती. पोलिसांना मिळताच त्यांनी त्वरित CCTV च्या साहाय्याने शोध घेण्यास सुरुवात केली. दरम्यान कुर्ला पोलीस स्थानकाच्या cctv मध्ये वैष्णवी त्यांना रेल्वेतुन उतरताना दिसली. त्या अनुषंगाने तपास करत पोलिसांनी तिला मानखुर्दमधल्या 'चिल्ड्रन होम'मधून ताब्यात घेतलं आणि सांगवेकर कुटुंबियांच्या स्वाधीन केलं.


कपड्यांसाठी हट्ट 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिवाळी निमित्त आपल्यालाही नवीन कपडे घ्यावेत असा हट्ट कळवा  घोलाईनगर इथल्या जीवनदीप सोसायटीत राहणाऱ्या ७ वर्षीय वैष्णवी सांगवेकर हिने आईकडे धरला होता. मात्र आईनं काही कारणास्तव तिला नकार दिला आणि मुंबईथल्या वरळी इथे आपल्या कामासाठी निघून गेली. मात्र वैष्णवीसुद्धा हट्टाने आई पाठोपाठ गेली.


आई ज्या रेल्वेगाडीत चढली त्याच गाडीमध्ये तीही चढली. मात्र थोड्याच वेळात घाबरलेली वैष्णवी कुर्ल्याला उतरली आणि रडू लागली.


तिला रडताना बघून एका महिलेने तिला रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन केले. कुर्ला जीआरपीने तिला मानखुर्द येथील चिल्ड्रन होमकडे सुपूर्द केलं होतं.