Thane Crime : पालकांचं लक्ष नसल्याने किंवा अतिलाडाने मुलं हट्टी हातात. आपल्या मनाविरुद्ध कोणती गोष्ट घडली की त्यांना पटकन राग येतो. यातून अनेकवेळा मुलं हिंसक (Violent) होतात. अशीच एक धक्कादायक घटना ठाणे जिल्ह्यात (Thane) उघडकीस आली आहे. ठाणे जिल्ह्यातील भाईंदरमध्ये (Bhayander) एका 13 वर्षांच्या मुलाने इमारतीच्या सोळाव्या मजल्यावरुन उडी मारत आत्महत्या (Suicide) केली. याबाबताची माहिती पोलिसांना (Navghar Police) देण्यात आली. पोलीसांनी घटनास्थळी दाखल होत तपास सुरु केला. पोलीस तपासात समोर आलेली माहिती अत्यंत धक्कादायक होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय आहे नेमकी घटना?
भाईंदर मधल्या न्यू गोल्डन एरिया परिसरातील सोनम इंद्रप्रस्थ नावाची इमारत आहे. याच इमारतीत सोळाव्या मजल्यावर मुलगा आपल्या कुटुंबासह राहात होता. मुलगा 13 वर्षांचा असून तो आठव्या इयत्तेत शिकतो. घटनेच्या दिवशी त्याचा मावस भाऊ त्याला केस कापायला सलूनमध्ये घेऊन गेला. पण सलूनवाल्याने त्याचे केस एकदम बारीक कापले. त्यामुळे मुलगा प्रचंड संतापला. त्याने घरी येऊन आदळाआपट सुरु केली. घरच्यांनी त्याची समजूत काढण्याता प्रयत्न केला. पण केस बारीक कापल्याचा राग त्याच्या मनात होता.


खिडकीतून खाली उडी मारली
घरच्यांनी समजूत घातल्यानंतर तो मुलगा शांत झाला. पण त्याच्या मनातील राग कमी झाला नव्हता. रात्री जेवण झाल्यानंतर मुलगा आपल्या खोलीत गेला आणि बेडरुमच्या छोट्या खिडकीतून त्याने सोळाव्या मजल्यवरुन खाली उडी मारली. यात त्या मुलाचा जागीच मृत्यू झाला. भाईंदरमधल्या नवघर पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. 


मृत मुलगा हा कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. त्याला दोन मोठ्या बहिणी आहेत. कुटुंबातील एकुलता एक मुलगा असल्याने सर्वांचाच तो लाडका होता. पण त्याच्या मृत्यूने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. 


इअरफोनने घेतला जीव
दरम्यान छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इअरफोन कानात घालून बोलणं एका तरुणाच्या जीवावर बेतलं. 21 तरुणाचा रेल्वेखाली येऊन मृत्यू झाला. छत्रपती संभाजीनगरमधल्या मुकुंदवाडी भागातील सकाळी सात वाजण्याची ही घटना आहे. रमेश गुंड असं या तरुणाचं नाव असून रात्रपाळी करुन तो कंपनीतून सकाळी घरी परतत होता. कानात इअरफोन घालून तो रेल्वेट्र्रॅकवरुन चालत होता. कानात इअरफोन असल्याने मागून येणाऱ्या ट्रेनचा त्याला अंदाज आला नाही. वेगात असलेल्या ट्रेनने तरुणाला चिरडलं. यात रमेशचा जागीच मृत्यू झाला.