Dahihandi : दहीहंडीबाबत मनसे आक्रमक, अविनाश जाधव ताब्यात ... आज काय होणार?
दहीहंडी उत्सवावर कोरोनाच सावट
मुंबई : कृष्ण जन्माष्टमीच्या मुर्हतावर ठाण्यात मनसेने दहीहंडी फोडून उत्सवाचे स्वागत केलं. आणि पुन्हा आम्ही दहीहंडी उत्सव साजरा करू असा इशारा सरकारला दिला आहे. ठाणे पोलिसानं समोरच मनसेने दोन थर लावून हंडी फोडली. मनसेने पोलिसांसमोरच दहीहंडी फोडल्याने मनसेचे कार्यकर्ते आणि गोविंदा पथकांना ताब्यात घेतलं. हंडी फोडल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा दिल्या. सरकारने निर्बंध घातले असले तरी आम्ही दहीहंडी साजरी करणार या मतावर मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव ठाम आहेत. पण, आज मनसे कशाप्रकारे दहीहंडी साजरी करणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
एकीकडे भाजप आणि मनसेनं दहीहंडी उत्सव साजरा करणारच, असा इशारा दिलाय. तर दुसरीकडे राज्य सरकारनं दहीहंडी साजरी करण्याबाबतच्या नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.