ठाणे घोडबंदर रोड- कॅडबरी जंक्शन भागात प्रचंड वाहतूक कोंडी; या वाटेनं जाणं टाळा
ठाणे घोडबंदर रोड- कॅडबरी जंक्शन भागात प्रचंड वाहतूक कोंडी; या वाटेनं जाणं टाळा
Thane Traffic Jam : लागून आलेल्या सुट्ट्या आणि आठवड्याचा शेवट या दोन्ही कारणांनी सध्या अनेकांनीश शहरातून काढता पाय घेत काही निवांत ठिकाणांना भेट देण्याचं ठरवलं आहे. परिणामी शुक्रवारी रात्रीपासूनच बहुतांश मुंबईकरांनी शहराबाहेर निघण्यास सुरुवात झाली. ज्यामुळं Exit Points वर प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं.तिथं ठाण्यातही याचे परिणाम दिसून आले. ठाण्यातील घोडबंदर रोड- कॅडबरी जंक्शन भागात प्रचंड वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. ज्यामळं वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळालं. वाहतुक कोडींमुळं मुंबई- नाशिक महामार्गावरही Traffic Jam पाहायला मिळत आहे.
वाहतुक कोंडीची पूर्वकल्पना
महाराष्ट्र पोलिसांच्या वाहतूक शाखेतर्फे ठाणे शहर पोलिसांकडून याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली होती. मेट्रो 4 च्या कासारवडवली ते गायमुखपर्यंतच्या पिलरवर गर्डर टाकण्याचं काम हाती घेण्यात येण्याच्या कारणामुळं इथं वाहतुकीच्या मार्गांमध्ये काही बदल करण्यात आल्याची माहिती वाहतुक शाखेडून जारी करण्यात आली होती. वरील कामासाठी मुंबई, ठाण्याकडून घोडबंदर रोडच्या दिशेनं जाणाऱ्या सर्व जड आणि अवजड वाहनांना कापूरबावडी जंक्शन येथून प्रवेश बंद असल्याचं यंत्रणांकडून स्पष्ट करण्यात आलं. ज्यामुळं शुक्रवारी रात्रीपासूनच या भागात प्रचंड वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. तर, ठाण्यातील अंतर्गत सिग्नल यंत्रणेतही बिघाड झाल्यामुळं वाहतूक कोंडीच्या समस्येत भर पडली.
पर्यायी मार्ग
मुंबई, ठाण्यातून घोडबंदरच्या दिशेनं जाणारी सर्व वागनं कापूरबावडी शाखेजवळून उजवं वळण घेऊ खारेगाव टोलनाक, मानकोली, अंजुर फाटा मार्गानं पुढे जातील. तर, काही वाहनं कापूरबावडी जंक्शनवरून उजव्या दिशेनं कशेळी, अंजुर फाटा येथे पोहोचतील.
दरम्यान, सध्या पुढील काही दिवसांसाठी या भागात ही वाहतूक कोंडी अपेक्षित असून, रात्रीच्या वेळी ही विकासकामं हाती घेण्यात येतील तेव्हाच मार्ग वळवलेले असतील. पण, सकाळी या वाहतुक कोंडीनंतरचे परिणाम मात्र कायम राहतील. त्यामुळे तारखेपर्यंत ठाण्यातून प्रवास करताना विचार करा, जास्तीचा वेळ हाताशी ठेवा.