देवाक् काळजी! गणेशोत्सवानिमित्तानं रेल्वे विभागाची कोकणकरांना खास भेट

Ganeshotsav 2023 : कोकणात जायचंय? रेल्वेची तिकिटं नाहीयेत? आताच पाहा ही बातमी.... आनंद ओसंडून वाहील. कारण, रेल्वे विभागानं घेतलाय मोठा निर्णय 

Aug 12, 2023, 07:13 AM IST

Konkan Railway : कोकणच्या दिशेनं जाण्याचा सर्वात सोपा आणि सुखकर मार्ग म्हणजे रेल्वे प्रवास. बरेचजण असं नेमकं का म्हणतात याची प्रचिती तुम्हाला पावसाळ्याच्या दिवसांमध्ये नक्कीच येईल. 

1/8

गणेशोत्सव

Ganeshotsav 2023 Konkan railway western railway to have 22 extra trains latest update

Special trains on konkan railway route for ganeshotsav : अवघ्या महिन्याभरावरच गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी प्रत्येकजण सज्ज होत असतानाच कोकणकर आपआपल्या परिनं गावाकडे जाण्याची तयारी करताना दिसत आहेत.

2/8

कोकणातील गणेशोत्सव

Ganeshotsav 2023 Konkan railway western railway to have 22 extra trains latest update

जगाच्या कोणत्याही कोपऱ्यावर असाल तरी कोकणातील गणेशोत्सवाची बात न्यारी हे तुम्हालाही आतापर्यंत लक्षात आलंच असेल. हा गणेशोत्सव इतका खास की, रेल्वे विभागही त्यांच्या परिनं प्रवाशांच्या आणि पर्यायी बाप्पाच्या सेवेसाठी आला आहे. 

3/8

22 विशेष फेऱ्या

Ganeshotsav 2023 Konkan railway western railway to have 22 extra trains latest update

गणेशोत्सवाच्या दिवसांमध्ये कोकणातून ये-जा करणाऱ्यांचा वाढता आकडा लक्षात घेता पश्चिम रेल्वेनं गणपती विशेष फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ज्याअंतर्गत उधना - मडगाव, मंगळुरू आणि अहमदाबाद- कुडाळ या मार्गांवर 22 विशेष फेऱ्या घेण्यात येतील. ज्यामुळं पश्चिम रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांना मोठा दिलासा असेल.   

4/8

तिकिटं काढण्याची मुभा

Ganeshotsav 2023 Konkan railway western railway to have 22 extra trains latest update

शनिवार 12 ऑगस्टपासून या रेल्वेच्या फेऱ्यांसाठी तिकिटं काढण्याची मुभा प्रवाशांना असेल. रेल्वेच्या या निर्णयानंतर उधना - मडगाव स्पेशल रेल्वे उधना येथून शनिवार आणु बुधवारी दुपारी 3 वाजून 25 मिनिटांनी निघून दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी मडगाव येथे पोहोचेल. 

5/8

रेल्वे प्रवाशांच्या सेवेत

Ganeshotsav 2023 Konkan railway western railway to have 22 extra trains latest update

16 ते 30 सप्टेंबरदरम्यानच्या काळात ही रेल्वे प्रवाशांच्या सेवेत असेल. तर, मडगाव - उधना रेल्वे रविवार आणि गुरुवारी धावणार आहे. मडगाव येथून या रेल्वेचा प्रवास सकाळी 10 वाजून 20 मिनिटांनी सुरु होईल आणि दुसऱ्या दिवशी 5 वाजता ती उधना येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासाची ही रेल्वे 17 सप्चेंबर ते 1 ऑक्टोबरपर्यंत सुरु राहील.

6/8

विशेष रेल्वे

Ganeshotsav 2023 Konkan railway western railway to have 22 extra trains latest update

अहमदाबाद कुडाळ ही विशेष रेल्वे अहमदाबाद येथून आठवड्यातील दर मंगळवारी सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी सुटेल. 

7/8

परतीचा प्रवास

Ganeshotsav 2023 Konkan railway western railway to have 22 extra trains latest update

उधना - मंगळुरू रेल्वे आठवड्यातून दर बुधवारी धावेल. 13 ते 27 सप्टेंबरदरम्यान ही रेल्वे प्रवाशांच्या सेवेत असेल. तर, परतीची मंगळुरू उधना रेल्वे दर गुरुवारी प्रवाशांच्या सेवेत असेल. 14 ते 28 सप्टेंबरच्या काळात ही रेल्वे प्रवाशांच्या सेवेत असेल. 

8/8

गणपती बाप्पा मोरया

Ganeshotsav 2023 Konkan railway western railway to have 22 extra trains latest update

थोडक्यात तिकिट नाहीत, रेल्वे नाही असं म्हणणाऱ्यांचा प्रश्न आता मिटला आहे. त्यामुळं बाप्पाचं नाव घेऊन चला कोकणात....