ठाणे जिल्हा परिषदेतील विजयी उमेदवार मातोश्रीवर
ठाणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत विजयी झालेल्या शिवसेना उमेदवारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली.
मुंबई : ठाणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत विजयी झालेल्या शिवसेना उमेदवारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली.
शिवसैनिक आणि जनतेचे आभार
यावेळी उद्धव ठाकरेंनी ठाण्यातील शिवसैनिक आणि जनतेचे आभार मानले.
उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
ठाण्याच्या जिल्हा परिषदेनं महाराष्ट्राला एक नवी दिशा दाखवली असेल तर तिचं स्वागत अख्खा महाराष्ट्र करेल असं सूचक विधान यावेळी उद्धव ठाकरेंनी केलं.
राहुल गांधींना शुभेच्छा
काँग्रेस पक्षाचे नवे अध्यक्ष म्हणून सूत्रं स्विकारलेल्या राहुल गांधी यांना यावेळी उद्धव ठाकरेंनी शुभेच्छा दिल्या.
सरकार म्हणून शिवसेेनेनं समर्थन दिलं
तर, सत्तेतून बाहेर पडण्याच्या युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या विधानावर स्पष्टिकरण देताना, सरकार म्हणून भाजपला शिवसेनेनं समर्थन दिलं आहे. या पाठिंब्याच्या मोबदल्यात चांगल्या गोष्टींची अपेक्षा शिवसेना बाळगत असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.