CM Uddhav Thackarey Live :  राज्यात सत्तानाट्याला वेग आला आहे. यातच आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: उपस्थित राहिले. आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर, उस्मानाबादचं नामांतर धाराशिव  आणि  नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटलांचं नाव देण्याचा प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी भाषण केलं.  मला सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद असं सांगत मुख्यमंत्र्यांनी सर्वांचे आभार मानले. तसंच मला माझ्याच काही लोकांनी दगा दिल्याने ही परिस्थिती उद्धभवल्याची खंत मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवली.


जी कायदेशीर प्रक्रिया आहे त्याला सामोरं जाऊ, या अडीच वर्षात तुम्ही सहकार्य केलं, जर माझ्याकडून कोणाचा अपमान झाला असले कोणी दुखावले असतील तर मी माफी मागतो, असं भावनिक वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलं. 


गेल्या अडीच वर्षात काँग्रेस आणि राष्ट्रवादीने चांगलं सहकार्य केलं, पण मला माझ्याच पक्षातील लोकांनी दगा दिला, याचं दु:ख वाटतं अशी भावना मुख्यमंत्र्यानी यावेळी बोलून दाखवली. उद्या विश्वासदर्शक ठराव मांडला जाणार आहे. त्याआधी मुख्यमंत्र्यानी राजीनाम्याचा सूतोवाच केल्याचं आता बोललं जात आहे. 


ठाकरे सरकारची अग्नीपरीक्षा
एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) नेतृत्वाखाली शिवसेनेच्या (Shivsena) 39 आमदारांनी आणि 10 अपक्ष आमदारांनी बंड पुकारल्यानं उद्धव ठाकरे (CM Uddhav Thckeray) सरकार अल्पमतात आलं आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून गुरुवारी विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिलेत. 


गुरुवारी विशेष अधिवेशन बोलावून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करावं, असं आदेशात म्हटलंय. त्यामुळं अडीच वर्षं सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडी सरकारची गुरुवारी अग्निपरीक्षा असणार आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता ठाकरे सरकार बहुमत सिद्ध करू शकेल, अशी स्थिती नाही.