मोठी बातमी... 12वीचा निकाल 2 ऑगस्ट रोजी जाहीर होण्याची शक्यता
12च्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपणार?
मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहात सरकारने बोर्डाच्या परीक्षा रद्द करत अंतर्गत मुल्यमापनाच्या आधारावर विद्यार्थ्यांना पास करण्याचा निर्णय घेण्यात आला. 10वीचे निकाल जाहीर झाले आता पालक आणि विद्यार्थी 12वी निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या निकालाच्या तारखेची घोषणा रविवारी करणार आहे. महत्त्वाचं म्हणजे 2 ऑगस्ट रोजी निकाल जाहीर होण्याची शक्यता शिक्षण मंडळातील अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे.
सर्वेच्च न्यायालयाने बारावीचे निकाल 31 जुलैपूर्वी जाहीर करण्याचे निर्देश दिले होते. परंतु राज्यात गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे निकालाला उशिर झाल्याची माहिती राज्य शिक्षण मंडळातील सूत्रांनी दिली होती. महत्त्वाचं म्हणजे आता निकाल जाहीर करण्याची राज्य शिक्षण मंडळाची तयारी पूर्ण झाल्यामुळे सोमवारपर्यंत म्हणजे 2 ऑगस्टला निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.