गणेश कवडे, मुंबई : मुंबईत एक नवा पाहुणा आला आहे. या पाहुण्यामुळे सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. कोण आहे हा पाहुणा आणि तो कुठून आला?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईतल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच अचानक हिमालयीन ग्रिफन जातीच्या गिधाडाचं दर्शन घडलं. उद्यानातील एका झाडाच्या शेंड्यावर हे गिधाड शांतपणे बसलं होतं. लायन सफारी दरम्यान वनकर्मचाऱ्यांच्या नजरेत हा पाहुणा आला. माणसंच काय अगदी कवळे सुद्धा या नवख्या पाहुण्याकडे आश्चर्यानं पाहात असावेत असे वाटत होते. बाकदार मानेचा हा वजनदार पक्षी शुक्रवारी तीन तास एकाच परिसरात होता.


मध्य आशियामधील पामीर पर्वतरांग, काझाखस्तान, तिबेटी पठार आणि हिमालय पर्वतरांगांमध्ये या प्रजातीच्या गिधाडांचे वास्तव्य आहे.. तिथेच त्यांचे प्रजनन कार्य चालतं. लहान गिधाडं आपलं अस्तीत्त्व सिद्ध करण्यासाठी इतर प्रदेशामध्येही जातात. गोवा, हैदराबाद इथंही ही गिधाडं दिसली होती.. कोकणातही त्यांचा वावर आढळून आला होता.  १९९५ पासूनच ही प्रजाती संकटात आली.


'हिमालयीन ग्रिफन' या गिधाडाचे वजन वजन ८ ते १२ किलो पर्यंत असतं त्यांच्या पंखांचा व्यास ९ ते १० फूट इतका असतो.  २००० सालापर्यंत ९५ ते ९९ टक्के गिधाडे लुप्त झाली. त्यांतर गिधाड पक्षी अतिसंकटग्रस्त झाला. 


मृत प्राण्यांवर जगणारी गिधाडं निसर्गाचे खरे स्वच्छता दूत.... कधी काळी मुंबईत त्यांचा वावर होता. आता मुंबईत पुन्हा गिधाडाचं अस्तीत्त्व दिसून आलं आहे.. त्यामुळे मुंबीतला पर्यावास या पक्षांना पुन्हा आकर्शित करतोय का याचा अभ्यास पक्षीमित्र करणार आहेत.