मुंबईच्या नाल्यात भावा-बहिणीचा मृतदेह
मृत मुलांमध्ये मोहम्मद शमीम अख्तर शाह (वय ७ वर्षे) आणि मोहम्मद नसीम अख्तर हुसेन शाह (वय ५ वर्षे) होते.
मुंबई: मुंबईतील शिवाजी नगर येथे दोन लहान मुलांचे मृतदेह सापडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शिवाजी नगर पोलिस स्थानकात या अपघाताची नोंद झाल्यानंतर पोलीस मृत्यूची चौकशी करत आहेत.
मृत मुलांमध्ये मोहम्मद शमीम अख्तर शाह (वय ७ वर्षे) आणि मोहम्मद नसीम अख्तर हुसेन शाह (वय ५ वर्षे) होते. दोघा भावा-बहिणींचा हा मृतदेह असल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संध्याकाळी पाच वाजता बिस्मिल्ला मस्जिदजवळील त्यांच्या घराजवळ दोन्ही मुलांचा बेशुद्ध मृतदेह आढळून आला. दोघांनाही घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले.