मुंबई : कालपासून पुन्हा एकदा मुंबईमध्ये थंडीचा जोर वाढला असून हवेत थंडावा आहे. आगामी तीन दिवस मुंबईतील हवेत असाच थंडावा जाणवण्याची शक्यता कुलाबा वेधशाळेने व्यक्त केला आहे. तर आगामी २४ तास मध्य महाराष्ट्र गारठलेलाच राहिल, अशी माहिती मुंबई प्रादेशिक हवामान विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आगामी दोन दिवसात मुंबईतील हवामान १६ ते १८ अंशांपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे. तर महाराष्ट्रात १४ अंशांपर्यंत खाली येण्याची शक्यता कुलाबा वेधशाळेनं व्यक्त केली आहे. उत्तरेकडून वाहणारं वारं हे थंड आणि शुष्क असून हवेतील आर्द्रता ५० टक्के कमी असल्यामुळे सध्या थंडावा जाणवत असल्याचेही त्यांनी सांगितले.