मुंबई : मनीलॉण्ड्रींगप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या याचिकेवर आता मंगळवारी निर्णय होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) निर्णय राखून ठेवला आहे. नवाब मलिक यांनी ईडीच्या (ED) कारवाईला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. यावर आज सुनावणी झाली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ईडीने केलेली अटक बेकायदेशीर असल्याचा दावा नवाब मलिक यांचे वकिल अॅड अमित देसाई यांनी केला. तर अटक कायदेशीर असल्याचा युक्तिवाद ईडीकरुन करण्यात आला.


कुख्यांत गुंड दाऊद इब्राहिम यांच्याशी आर्थिक व्यवहार तसेच त्यांच्या बहीणीशी जमीन व्यवहार आदीबाबत नवाब मलिकांना ईडीने अटक केली होती. त्यानंतर नवाब मलिक आधी ईडी कोठडी आणि नंतर न्यायालयीन कोठडीत होते. 15 मार्चपर्यंत मलिक यांना न्यायालयीन कोठडीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 


अटक करण्यामागे राजकीय हेतू असून ती बेकायदा ठरवण्याच्या मागणीसाठी मलिक यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. आधी विशेष न्यायालयाच्या ३ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावण्याच्या आदेशालाही मलिक यांनी आव्हान दिले होते, आणि आता मार्चपर्यंत मलिकांना आहे न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे, याला सुद्धा मलिकांनी आव्हान दिलं आहे. याशिवाय ईडीने या प्रकरणी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याची, आपल्याला करण्यात आलेली अटक बेकायदा ठरवून आपली तातडीने सुटका करण्याची मागणी मलिक यांनी याचिकेद्वारे केली आहे.