मुंबई : मुंबईमध्ये गौरी-गणपतीच्या विसर्जनाला सुरुवात झाली आहे. मुंबईच्या पवई तलाव परिसरामध्ये भाविक गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी येत आहेत . गणेश विसर्जनासाठी पवई तलाव परिसरामध्ये पालिका प्रशासनाकडून तसेच पोलीस प्रशासनाकडून व्यवस्था करण्यात आली आहे . पवई तलावामध्ये असलेल्या मगरींचा वावर पाहतात पवई तलावात थेट गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी पाण्यामध्ये उतरण्यास प्रशासनाकडून मनाई करण्यात आलेली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गणेश विसर्जनासाठी या परिसरात स्वयंसेवक नेमण्यात आलेले आहेत.  ज्या ठिकाणी गणेश विसर्जन करण्यात येणार आहे त्या गणेश घाटावर तारेचे कुंपण तयार करण्यात आलेलं आहे.या कुंपणाच्या बाहेर मगरीचा वावर दिसून येतोय त्यामुळे पवई तलाव परिसरात गणेश विसर्जनासाठी जर तुम्ही येत असाल तर पाण्यात उतरण्याचा चुकूनही प्रयत्न करू नका. 



तलावातील मगरिंचा वावर पाहाता पाण्यात उतरण्यास मनाई घालण्यात आली आहे. आज 5 दिवसांच्या गणरायाचं  विसर्जन असल्यामुळे  गणेश भक्त  तलावाच्या दिशेने येत आहेत. मुंबईत विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात येते. परंतु काही भाविक तलावाच्या दिशेने येत आहेत. त्यामुळे याठिकाणी जीवरक्षक नेमून दिले आहेत.