मिठी नदी किनारी हरणांचा मुक्त संचार
देशातच नाही तर संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने हाहाःकार माजवला आहे.
मुंबई : देशातच नाही तर संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने हाहाःकार माजवला आहे. ऐकीकडे कोरोना व्हायरसच्या भीतीने संपूर्ण जग घरात बसलं आहे. तर दुसरीकडे प्राणी पक्षी सर्वत्र मुक्तपणे संचार करताना दिसत आहे. जेव्हापासून देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आला तेव्हा पासून प्राणी आणि पक्षी जिकडे-तिकडे मनसोक्त फिरताना दिसत आहेत. असे अनेक फोटो, व्हिडिओ देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेले आपण पाहिले. आता देखील मिठी नदी किनाऱ्यावरील एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये मिठी नदी किनारी हरणांचा कळप मुक्त संचार करताना दिसत आहे. हे नयनरम्य दृष्य वकील आणि पर्यावरणप्रेमी अफरोज शाह यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून पोस्ट केलं आहे. ही पोस्ट शेअर करत त्यांनी कॅप्शनमध्ये, 'लॉकडाउनचे हे सर्व सकारात्मक परिणाम आहेत...' असं लिहिलं आहे.
अफरोज शाह यांनी हा व्हिडिओ २ जुलै रोजी सोशल मीडियावर शेअर केला. सध्या हा व्हिडिओ तुफान व्हायरल होताना दिसत आहे. आतापर्यंत २० हजारांपेक्षा जास्त नेटकऱ्यांनी हा व्हिडिओ पहिला आहे . शिवाय अनेकांनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.