मुंबई : गणेशोत्सवाचा आजचा (सोमवार) अखेरचा दिवस आहे. उद्या (मंगळवार) गणेशाचे विसर्जन होणार असल्यामुळे आपल्या लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी भक्तांनी गर्दी केली आहे. राजधानी मुंबईसह राज्यभरात ठिकठिकाणी हिच स्थिती असून, रस्ते, बाजारपेठा आणि गणेश मंदिरे, मंडळांच्या गणपतींसमोरचे आवार भक्तांनी फुलून गेले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, गणपती विसर्जनाला होणारी गर्दी विचारात घेऊन पोलीस प्रशासनाने रस्ते वाहतूकीत मोठा बदल केला आहे. त्यामुळे वाहने घेऊन गणपती दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची अचानक झालेल्या या बदलामुळे गोची होत आहे. मात्र, तरीही भक्तांच्या उत्साहावर याचा काहीही परिणाम झाला नाही. लोक आपल्या कुटुंबांसह, चिमुकल्यांसह बाप्पाच्या दर्शनासाठी आले आहेत.


गणपती मंडळांनी विसर्जनासाठी खास तयारीही केली आहे. त्यासाठी ढोलपथके, ट्रॉल्या, गाड्या, ट्रक सजवण्यास सुरुवात झाली आहे. तसेच, काही गणेशमंडळांनी आपल्या कार्यकर्त्यांची बैठक घेऊन मिरवणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, याकडे लक्ष देण्याबाबतही सूचना दिल्या आहेत.