मुंबई : एका बाळाच्या जन्माचं स्वागत करण्यासाठी मुंबई लोकल तब्बल पंधरा मिनिटं थांबली. घाटकोपर स्टेशनवर हा प्रकार घडलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुडिया शेख लोकलमधून तिच्या पतीसोबत नातेवाईकांकडे जायला निघाली. गरोदर असलेल्या गुडियाला प्रसूतीवेदना सुरू झाल्या, त्यामुळे दोघांनीही परत टिटवाळ्याला जाण्यासाठी कल्याण लोकल पकडली. पण प्रसूतीवेदना असह्य झाल्यानं घाटकोपर रेल्वे स्थानकातच प्रसुती करण्याचा निर्णय सहप्रवाशांनी घेतला.


 घाटकोपर स्टेशनला आल्यावर लोकल थांबली. महिला प्रवाशांनी पुढाकार घेतला. महिलांनी तिच्याभोवती गराडा घातला. महिला होमगार्डही तिथे पोहोचल्या आणि सगळ्यांच्या मदतीनं गुडियाची प्रसूती यशस्वी झाली.


तिला मुलगी झाली. हे सगळं होईपर्यंत लोकलही थांबून राहिली. पण महत्त्वाचं म्हणजे स्टेशन आवारात सुरू झालेल्या वन रुपी क्लिनीकमधले वैद्यकीय अधिकारी मात्र प्रसूती झाल्यावर पोहोचले.