पुढचं सरकार आपलेच, शिवसेनेचा मुख्यमंत्री असणार - उद्धव ठाकरे
काळजी करु नका. पुढचे सरकार आपलेच असेल. मुख्यमंत्री हा शिवसेनेचा असणार आहे, असा विश्वास पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या आमदारांना दिला आहे.
मुंबई : काळजी करु नका. पुढचे सरकार आपलेच असेल. मुख्यमंत्री हा शिवसेनेचा असणार आहे. तिन्ही पक्ष एकत्र आहेत. घाबरण्याचे कारण नाही. ताकदीने न्यायालयीन लढाई लढू, असा विश्वास पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या आमदारांना दिला आहे. शिवसेना आमदारांचा मुक्काम हॉटेल ललितमध्येच आहे. आपण मुंबईच्या बाहेर जायचे नाही. यापुढेही आपण मुंबईत ठाण मांडून राहायचे आहे, असे उद्धव यांनी स्पष्ट केले.
शिवसेना आमदारांची बैठक हॉटेल ललितमध्ये झाली. यावेळी आमदारांनी शांत राहावे, असे आवाहन त्यांनी केले. शरद पवारांशी माझे बोलणे झाले आहे आणि आम्ही सर्व हालचालींवर सतत नजर ठेवत आहोत. तुमचा विश्वास गमावू नका. आपल्याला खात्री बाळगा आपण अजून संधी गमावलेली नाही. ३० तारखेला आम्ही भाजपाला बहुमत सिद्ध करु देणार नाही. सरकार फक्त आमचेच असेल. यावेळी, आपण सर्वांनी एकत्र राहण्याची गरज आहे, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी उपस्थित आमदारांना दिला